________________
१०४
अर्धमागधी व्याकरण
३ अर्धमागधीत कधी कधी ह्र तसाच राहतो असे दिसते. पा.स.म., पृ.११९९
वर ह्रद, ह्रस्स आणि ह्रास असे शब्द देण्यात आले आहेत. 'हस्स' (ह्रस्व) याबद्दल पिशेलने (इं. पृ. २४५) असे म्हटले आहे. हस्तलिखिते व ग्रंथ यात पुष्कळदा ह्रस्स आढळते. ह्र चे बाबतीत मराठीतल्याप्रमाणे अवयवविपर्यय मानला पाहिजे काय? तसे मानल्यास, ह बद्दल ह्र ही हस्तलिखिताच्या लेखकाची चूक मानली पाहिजे. हेमचंद्राचे मते 'सर्वत्र लबरामवन्द्रे' (२.७९) वन्द्र शब्द सोडून इतर सर्वत्र र चा लोप होतो. तसेच 'द्रे रो न वा।' हेम. २.८० द्रशद्वे रेफस्य वा लुग् भवति। (द्र मध्ये र् चा विकल्पाने लोप होतो) ह्रदशब्दस्य स्थितिपरिवृत्तौ द्रह इतिरूपम्। तत्र द्रहो दहो। केचिद् लोपं नेच्छन्ति। चंडाचे मतेही(रेफ: पूर्वश्च। - सर्वस्मात् व्यंजनात् पर: पूर्वस्थश्च रेफो लोपो भवति/३.९) संयुक्तव्यंजनात र चा सर्वत्र लोप होतो. ३.९ या सूत्राखाली
'ह्रस्व: हस्सो'। हे उदाहरणही आढळते. ४ हल मध्ये अवयवांचा स्थान-विपर्यय होतो.
३ ह्+ल=लू४ : आह्लाद=अह्लाय, कह्लार=कह्लार,
प्रह्लादनीय पल्हायणिज्ज, पलवपल्हव, पह्लादनी पल्हायणी ४ ह+व्=ब्भ् : जिह्वा =जिब्भा, विह्वल विब्भल
टीप : कधी कधी व चा लोप होऊन नुसता ह शिल्लक राहतो. विह्वल-विहल ह् हा द्वितीय अवयव : +ह : हूँ मध्ये कधी कधी ह् चा लोप होऊन र् रहातो. दशाह दसार पण प्रायः ह चे बाबतीत स्वरभक्तीचा अवलंब केला जातो.
गर्हा=गरिहा, अर्हति=अरहइ, बर्ह=बरिह १०५ मध्य विसर्गाचे विकार
पुढे सांगितल्याप्रमाणे मध्य विसर्गाचे विविध विकार होतात. १ कधी कधी ह्व चे सुलभीकरण होते : जिह्वा जीहा