________________
प्रकरण ६ : संयुक्तव्यंजन-विकार
१०३
(ई) कधी कधी म्ह मधील म् चा लोप होऊन नुसता 'ह' उरतो.
कूष्मण्ड =कूहंड (कोहळा), कूष्माण्डी कोहंडी, कोहली (कोहाळ्याचे)
१०४ ह् ची संयुक्तव्यंजने व त्यांचे विकार
ह् हा अवयव असलेल्या संयुक्तव्यंजनाचे विकार पुढील प्रमाणे होतात. (क) ह हा प्रथम अवयव : (अ) ह+अनुनासिक : (१) ह्+ण् =ण्ह् : गृह्णाति=गेण्हइ, अपराह्न =अवरह्ल, पूर्वाह्न =पुव्वण्ह,
पूर्वापराह्न=पुव्वावरण (२) + न् = न्ह् (ह्न) : वह्मि = वन्हि(ह्नि), मध्याह्य = (ह्न) चिह्म =चिन्ह,
निद्भुते = निह्नवइ (३) १+म्म्ह : ब्राह्मण बम्हण
अपवाद : (१) न्ह चा कधी कधी न्ध होतो : चिह्न चिंध (२) म्ह चा कधी कधी म्भ होतोः ब्राह्मण बंभण, ब्रह्मलोक=बंभलोय,
ब्रह्मचर्य=बंभचेर, ब्रह्मचारिन्=बंभयारि, ब्रह्माण्ड =बंभंड (ख) ह्+अंतस्थ : (१) ह्+य=ज्झ् : गुह्म=गुज्झ (म. : गूज), ग्राह्य=गेज्झ, सह्य-सज्झ,
अनुग्राह्य अणुगेज्झ, परिगृह्य परिगिज्झ (स्वीकारून), अभिरुह्य = अभिरुज्झ (चढून). ह्+र-हरे : ह्रद-हद (तळे), ह्रस्व-हस्स (लहान) टीप : कधी र चा लोप होऊन नुसता ह रहातो.
ह्रद=हद, ह्रास हास १ येथे अवयवांचा स्थान-विपर्यय होतो.
न ल ह्येषु नलमां स्थितिरूव॑म् । प्रा. प्र.३.८ २ अर्धमागधीत ह्र चे बाबतीत कित्येकदा स्वरभक्तीचा अवलंब केला जातो.
ह्री=हिरि, ह्रस्व हरस्स मराठीत मात्र ह्र चे बाबतीत अवयवांचा स्थान विपर्यय होतो. ह्रस्व-हस्व, ह्रास= हास.