________________
१०२
अर्धमागधी व्याकरण
सम्+शुद्धि संसुद्धि, सम्+सर्ग=संसग्ग, सम्+सक्त संसत्त; वंश=वंस, अंशु=अंसु, पांसु=पंसु, मांस-मस.
१०३ ऊष्म+अनुनासिक
ऊष्म+अनुनासिक असा योग असता, प्रथम अनुनासिक व ऊष्म यांच्या स्थानांचा परस्पर बदल होतो; मग ऊष्माबद्दल ह येतो.
उदा. ष्ण=ष्+ण्=ण्+ष्=ण+ह् (ऊष्माबद्दल ह्) =ण्ह (१) न=ण्ह (न्ह) : प्रश्नपण्ह, अश्नाति=अण्हाइ (भोजन करतो) (२) ष्ण=ण्ह : कृष्ण कण्ह (म. : कान्हा), उष्ण=उण्ह, विष्णु विण्हु,
वृष्णि वण्हि (एका वंशाचे नाव), उष्णीष=उण्हीस (शिरोवेष्टन),
तृष्णा तण्हा. (३) स्न =ण्ह : प्रस्तुत पण्हुय (क्षरलेला), अस्नान अण्हाण, ज्योत्स्ना=जोण्हा (४) श्म=म्ह : कश्मीर कम्हीर (५) ष्म म्ह : ग्रीष्म गिम्ह, ऊष्मा उम्हा, युष्मादृश तुम्हारिस (६) स्म२=म्ह : विस्मय=विम्हय, अस्मादृश अम्हारिस
अपवाद : (अ) कधी कधी ऊष्माचा लोप होऊन अनुनासिकाचे द्वित्वरे होते निस्नेह=निन्नेह (आ) कधी कधी अनुनासिकाचा लोप होऊन ऊष्माचे द्वित्व होते.४
रश्मि रस्सि (दोरी, किरण, हिंदी :रस्सी), भस्मन्= (भस्स)-भास (इ) कधी 'म्ह' बद्दल 'म्भ' येतो
श्लेष्म्न=सेंभ (कफ), संस्मरति संभरइ.
१ आद्य संयुक्तव्यंजनात : स्नान=ण्हाण, स्नात=ण्हाय २ आद्य संयुक्तव्यंजनात : स्मः = म्हो ३ आद्य संयुक्तव्यंजनात : स्नेह-नेह, नेहालु (स्नेह-वत्) ४ (अ) आद्य संयुक्तव्यंजनात : श्मशान=सुसाण
(आ) अनुस्वारागम झाल्यास द्वित्वातील पहिल्या अवयवाचा लोप होतो अस्मिन्=अंसि, कस्मिन् कसि, यस्मिन्=जंसि, तस्मिन्=तंसि