________________
प्रकरण ६ : संयुक्तव्यंजन-विकार
१०१
१०० इतर संयुक्तव्यंजनांचे विकार
ज्यांना समानीकरणाचा नियम लागतो अशा संयुक्तव्यंजनांचा विचार वर झाला आहे. आता, इतर संयुक्त व्यंजनांच्या बाबतीत कोणते विकार होतात, ते पहावयाचे आहे.
१०१ अनुनासिक+स्पर्श
अनुनासिक+स्पर्श असा योग्य असता अनुनासिकाचा अनुस्वार होतो, व तो मागील वर्णाचे डोक्यावर लिहिला जातो. (१) ङ्+स्पर्श : अङ्ग अंग, पङ्क्ति पंति, सङ्केत संकेय, शङ्ख=संख (२) ञ्+स्पर्श : चञ्चल=चंचल, सञ्जात=संजाय, लाञ्छन-लंछण (३) ण्+स्पर्श : कण्ठ कंठ, घण्टा घंटा, दण्ड-दंड (४) न्+स्पर्श : निर्ग्रन्थ निग्गंथ, अन्ध=अंध, विन्ध्य=विंझ, सन्ध्या संझा. (५) म्+स्पर्श : चम्पक चंपग, आरम्भ आरंभ
अपवाद : (अ) ज्या संख्यावाचकात२ ‘पंचन्' आहे. तेथे ञ्च चा कधी न्न, तर कधी एण, तर कधी नुसता ण होतो. श्चन्न : पन्नरस (१५), छप्पन्न (५६) ञ्च=ण्ण : पणवण्ण (५५), पण्णट्ठि (६५), पण्णत्तरि (७५) ञ्च=ण : पंचविंशति=पणुवीस (२५) (आ) कधी ञ्च चा ण्ट झालेला आढळतो.३
आकुञ्चन आउंटण
१०२ अनुनासिक+ऊष्म
अनुनासिकापुढे ऊष्मवर्ण असता अनुनासिकाचा अनुस्वार होतो. १ कधी परसवर्ण लिहिला जातो. २ संख्यावाचके पहा. ३ आर्षे अन्यदपि दृश्यते। आकुंचनं आउंटणं । अत्र चस्य टत्वम्। हेम.
१.१७७ ४ प्रायः हे अनुनासिक म् असते.