________________
१००
९९ अंतस्थ + अंतस्थ
अंतस्थांचा ल् > व् > य् > र् असा उतरता बलक्रम आहे. कमी बलवान् अंतस्थाचा लोप होऊन उरलेल्याचे द्वित्व होते. (र्चा नेहमीच लोप होतो) (१) य्य =ज्ज : शय्या = सेज्जा, साहाय्य =साहेज्ज.
(२) र्य =ज्ज : कार्य = कज्ज ( म. : काम), आर्य = अज्ज (म.: आजा), भार्या=भज्जा, पर्याप्त=पज्जत्त ( पुरेसे ), पर्यवसान=पज्जवसाण.
अपवाद : (१) कधी र्य चाल्ल होतो. उदा. : पर्याण=पल्लाण (खोगीर), सौकुमार्य= सोगुमल्ल
(२) कधी र्य चा ल्ह होतो : पर्यस्त = पल्हत्थ (क्षित ; पालथा ) (३) कधी र्य चा ल होतो : पर्येति = पलेइ (सभोवार जातो) (४) कधी र्य मधील य् चा लोप होऊन फक्त र् राहतो.
सूर्य= सूर, तूर्य = तूर ( वाद्यविशेष), धैर्य = धीर, ब्रह्मचर्य =बंभचेर, आश्चर्य=अच्छेर, सौन्दर्य = सुंदर, पर्यन्त = पेरंत ( हद्द), प्रातिहार्य=पाडिहेर (चमत्कार)
अर्धमागधी व्याकरण
= सल्ल,
(३) ल्य=ल्ल : कल्य = कल्ल ( पहाट ), कल्याण = कल्लाण, शल्य = कौशल्य=कोसल्ल, माल्य = मल्ल (माळ)
(४) व्य=व्व : काव्य = कव्व, कर्तव्य = कायव्व, द्रव्य=दव्व
(५) ल्व=ल्ल : पल्वल =पल्लल (डबके, लहान तळे), बिल्व = बिल्ल (बेल), गल्वर्क=गल्लुक्क (रत्नविशेष)
(६) र्व=व्व : सर्व=सव्व, पर्वत=पव्वय, गर्व=गव्व, पूर्व=पुव्व, निर्वाण निव्वाण (७) व्र४=व्व : तीव्र = तिव्व, परिव्राजक =परिव्वायग
(८) र्ल=ल्ल : निर्लज्ज=निल्लज्ज, दुर्लभ = दुल्लह, निर्लेप=निल्लेव
य् चा ज् होऊन ज्ज् असे द्वित्व होते.
(अ) समानीकरणाने य्य् होऊन मग त्याचा ज्ज् होतो.
(आ) पुष्कळदा र्य च्या बाबतीत स्वरभक्तीचा अवलंब केला जातो. उदा. आचार्य=आयरिय, भार्या=भारिया, आश्चर्य = अच्छरिय, आर्य = अरिय, अनार्य=अणारिय, वीर्य = वीरिय.
म. : पर्याय=पाळी, पर्यस्त - पालथा, पालट;
आद्य संयुक्तव्यंजनात : व्रीहि=वीहि
२
३
४