________________
मूकमाटी-मीमांसा :: 481
उसे क्या प्रयोजन जड़ शृंगारों से !" (पृ. १३९) 0 "दुःस्वर हो या सुस्वर/सारे स्वर नश्वर हैं।" (पृ. १४३) 0 "स्वर न ही ध्येय है, न उपादेय/स्वर न ही अमेय है, न सुधा-पेय
साधक यह जान ले भली-भाँति !" (पृ. १४४) आणि शेवटी कवी म्हणतो - की या नश्वर जीवनामध्ये - "सब रसों का अन्त होना ही-/शान्त-रस है।"(पृ.१६०)
ही कविता चैतन्य आणि जीवनकला या दोनही आशय प्रदेशांचा ठाव घेणारी आहे. देहरूप-न्याहाळता, न्याहाळता एका परब्रह्माचे बाळरूप पहाणारी ही स्वानंदमयी कविता आहे. स्व-स्वरूपाचे, स्व-स्वरूपा पर्यंत नेणाऱ्या वाटा दाखविणारी वैभव संपन्न कविता आहे. प्रत्येक माणसाच्या मनामध्ये अशांततेचे वादळ घोंघावते आहे. व असेच वादळ या लेखकाच्या मनातही येवून गेले असावे.पण त्या वादळाला ते दिशा देतात व त्यांना हे महाकाव्य सुचते. म्हणूनच ही कविता सर्व अशांत मनाची प्रतिनिधिक अभिव्यक्ती ठरते याची चर्चा करताना कवि म्हणतो :
"हे स्वामिन्!/समग्र संसार ही/दुःख से भरपूर है,/यहाँ सुख है, पर वैषयिक/और वह भी क्षणिक!/ यह तो 'अनुभूत हुआ हमें,/परन्तु/अक्षय सुख पर/विश्वास हो नहीं रहा है।" (पृ. ४८४-४८५)
यापुढे जावून सुंदर असे आध्यात्मिक दर्शन लेखकाने काव्यातून घडविले आहे. दर्शन आणि अध्यात्म यातील सूक्ष्म पण, निश्चित फरक कवीने पुढील पंक्तीतून मांडला आहे.
"क्या दर्शन और अध्यात्म/एक जीवन के दो पद हैं ? ...दर्शन का स्रोत-मस्तक है,/स्वस्तिक से अंकित हृदय से अध्यात्म का झरना झरता है। ...अध्यात्म स्वाधीन नयन है/दर्शन पराधीन उपनयन ...कभी सत्य-रूप कभी असत्य रूप/होता है दर्शन, जबकि अध्यात्म सदा सत्य-चिद्रूप ही/भास्वत होता है। ...दर्शन का आयुध शब्द है-विचार/अध्यात्म निरायुध होता है
सर्वथा स्तब्ध - निर्विचार !" (पृ. २८७-२८९) माती व कुंभ ही एकच प्रतिमा सर्व कविता मध्ये वापरून प्रत्येक विषयावरची अनुभुती वेगळी राखली गेली आहे. माटी व कुंभ हेच ह्या काव्यानुभवाचे माध्यम आहे. काही ठिकाणी उर्दू शब्द प्रयोगाचा योग्य प्रभावही लेखकावर झालेला दिसतो. असाच एक उर्दु प्रभावाचा प्रयत्न करताना कवी म्हणतो :
"जब हवा काम नहीं करती/तब दवा काम करती है, और जब दवा काम नहीं करती/तब दुआ काम करती है। परन्तु,/जब दुआ भी काम नहीं करती/तब क्या रहा शेष ?
...यह जो चेतना है-/स्वयंभुवा काम करती है।" (पृ. २४१-२४२) रोजच्या जीवनातील अवलोकनातील सामान्य विषयातून मोठा आशय देण्याचा समर्पक प्रयत्न आणि किमया या लेखकाने केली आहे. कुंभ हातात घेवून,विकत घेणारा कुंभावर आवाज काढतो. आणि त्यातून ‘सा-रे-ग-म-प