________________
482 :: मूकमाटी-मीमांसा ध-नि' असा आवाज निघतो असे कविला वाटते. या ‘सा-रे-ग-म' बद्दल कवि विश्लेषण करतो आणि म्हणतो :
“सा रे ग म यानी/सभी प्रकार के दुःख प"ध यानी ! पद-स्वभाव/और/नि यानी नहीं
दुःख आत्मा का स्वभाव - धर्म नहीं हो सकता।" (पृ. ३०५) मृदंगाच्या आवाजा संबंधी कवीचा कल्पना विलास व त्यातून निघणाऱ्या 'धा धिन् धिन् 'धा...'ह्या स्वराबद्दल कवी म्हणतो :
"धा "धिन धिन् "धा"/धाधिन धिन्धा '.. वेतन-भिन्ना, चेतन-भिन्ना,/ता"तिन तिन ता'..
ता"तिन "तिन "ता/का तन' "चिन्ता, का तन' "चिन्ता ?" (पृ. ३०६) कवीने साहित्याची चर्चा करताना 'साहित्य' या शब्दाचा अन्वयार्थ पुढील ओळीतून प्रभावीपणे मांडला आहे :
"हित से जो युक्त - समन्वित होता है/वह सहित माना है और/सहित का भाव हो/साहित्य बाना है, अर्थ यह हुआ कि/जिस के अवलोकन से/सुख का समुद्भव - सम्पादन हो
सही साहित्य वही है ।" (पृ. १११) जैन दर्शनातील उच्च कोटीचा शब्द 'निग्रंथ' या निग्रंथ अवस्थेबद्दल चर्चा करतांना कवि म्हणतो :
"अब रस्सी पूछती है रसना से/जिज्ञासा का भाव ले-/कि आपके स्वामी को क्या बाधा थी/इस गाँठ से ? सो रसना रहस्य खोलती है:/'सुन री रस्सी!/मेरे स्वामी संयमी हैं हिंसा से भयभीत/और/अहिंसा ही जीवन है उनका। ...हमारी उपास्य-देवता/अहिंसा है/और/जहाँ गाँठ-ग्रन्थि है/वहाँ निश्चित ही
हिंसा छलती है। ...निर्ग्रन्थ दशा में ही/अहिंसा पलती है।" (पृ. ६३-६४) आरत्या, अष्टके, जयमाला, धार्मिक-गीत येथेपर्यंतच जैन कवितेचा रचना प्रकार होता आणि एका विशिष्ट कारणाने लिहिली गेलेली काव्ये प्रचलित होती. पण आचार्य विद्यासागरांनी ती साहित्यिक संकुचितता सोडून या जैन कवितेला नवीन अविष्कार दिला आहे. आपल्या महाकाव्याच्या रूपाने अध्यात्मिक कविता नवीन रूपाने. त्याच्या आत्म्यानिशी भारतीय शारदेच्या भूमीत रूजविण्याचे श्रेय या विद्यासागरांना द्यायला हवे.
'मूकमाटी' या साहित्य कृतीबद्दल या देशाची माती ही मराठी जैन साहित्य परिषद आणि आजचे हे मराठी जैन साहित्य संमेलन (सांगली, महाराष्ट्र, डीसेंबर-१९९०)- चिरऋणी राहील, त्या तपोपूत विद्यासागराला'.
[ 'जैन बोधक' (मराठी-मासिक), सोलापूर-महाराष्ट्र में प्रकाशित]