________________
476 :: मूकमाटी-मीमांसा
है”(पृ.१६२); “अध्यात्म निरायुध होता है/ सर्वथा स्तब्ध - निर्विचार !" (पृ. २८९).
माती ही क्षुल्लक वस्तु नाही. या काव्यात 'माती' ही विकासोन्मुख मानवीं स्वभावाची पारदर्शी प्रतिमा आहे. चढत्या क्रमाने विकास मांडताना संतकविचे भावविश्व वाऱ्यासारखे गाणे होऊन सुदूर पसरते "इस पर्याय की / इति कब होगी ? / ... बता दो, माँ इसे !" (पृ. ५). मातीचे हे अंतरंग स्वर विकासाकडील वाटचाल दाखविणारे आहेत तर “कुछ उपाय करो माँ ! /... पद दो, पथ दो / पाथेय भी दो माँ ! " (पृ. ५) या शब्दातून उत्सुक मनाचे दर्शन होते . तळमळ व्यक्त करणारे हे शब्द आहेत. विकासासाठी कष्ट झेलावे लागतात. उन्नति सहजासहजी होत नाही. " इति के बिना/अथ का दर्शन असम्भव !" (पृ.३३) अशा ओळी हेच सुचवितात. विकास, उत्कर्ष, देवाधीन नाही, दैवाधीन नाही. "यतना घोर करना होगा / तभी कहीं चेतन - आत्मा / खरा उतरेगा " (पृ. ५७) या ओळी पुरूषार्थाचे महत्त्व सांगणाऱ्या आहेत.
[' श्राविका' मराठी - मासिक, सोलापुर - महाराष्ट्र, जुलाई - १९९२]
क
पृष्ठ २८ हाँ! अब शिल्पी ने
अहंकार का
वमन किया है!
০