________________
'मूकमाटी': साधनाची अनुभूति
लालचन्द्र हरिश्चन्द्र जैन भारतीय ज्ञानपीठाने १९८८ साली प.पू. आचार्य विद्यासागर रचित 'मूकमाटी' हा काव्यग्रंथ प्रकाशित केला आहे. आचार्य विद्यासागर हे दिगम्बर जैन साधु आहेत. रत्नत्रय साधनारत असल्यामुळे 'मूकमाटी' हे काव्य सुखद साधनेच्या अनुभूतीने ओतप्रोत आहे. म्हणून अध्यात्मा विषयी हे काव्य 'मूक' नाही. आत्मसाधने विषयी “स्व की उपलब्धि ही सर्वोपलब्धि है" (पृ.३४०) असे सांगणारे हे काव्य मूक कसे बरे होऊ शकेल ? चित्रविचित्र जड जगाकडे कानाडोळा करणारे “अध्यात्म स्वाधीन नयन है" (पृ.२८८) हेच खरे । अमुक म्हणजे कांही, अंदाजे, अनुमानाने असा अर्थ नाही. अनुमानाने तसा अर्थ काढू नये.
मातीसारख्या तुच्छ वस्तुला कवितेचा विषय बनवणे विशेष आहे असे काही जण म्हणतील पण साध्याही विषयांत मोठा आशय शोधणाऱ्या कविमनाच्या भूमीच्या मातीचे तुच्छ हा गुण नाही. अवढे खरे की कवितेचा विषय माती निवडणे ही स्वयं प्रकाशी कल्पना आहे कवि आचार्यांनी मातीचे बोट धरुन काव्यानंदापासून आत्मानंदापर्यंतचा प्रवास रसिक मनाला घडविला आहे. म्हणून “निरन्तर साधना की यात्रा/भेद से अभेद की ओर/...बढ़ती है, बढ़नी ही चाहिए'(पृ.२६७) असा निर्वाळा दिला आहे.
आचार्य कविश्रेष्ठ' आहेत की 'श्रेष्ठ कवि' आहेत ? निकष काय लावावे ? ही चर्चा व्यर्थ आहे, कारण त्याही पुढचे एक पाऊल म्हणजे आचार्य विद्यासागर हे 'सन्त कवि' आहेत . “ 'स्व' में रमण करना/सही ज्ञान का 'फल'' (पृ. ३७५)। हा संत कविचा संदेश होऊ शकतो. स्वत: स्वाश्रित स्वतंत्र जीवन जगून "स्वाश्रित जीवन जिया करो" (पृ.३८७) असे संत कवीच समर्थपणे म्हणू शकतात.
चार मोठमोठ्या खंडात आणि ४८८ पानात निबद्ध काव्य पाहिले की, आचार्य शीघ्र कवि आहेत हे पटते, पण ते शीघ्रकविपेक्षाही 'सहज कवि' जास्त शोभतात. कविश्रेष्ठ पदवीसाठी शीघ्र पेक्षा 'सहज' निकष लावणे अधिक योग्य. शीघ्र कवित्वामुळे शब्दांची पायघडी पसरू शकते, कल्पनांची नव्हें! कल्पनांच्या पायघडीवरून चालतांना कोमलतेचा अनुभव येतो तर केवळ शब्दांच्या पायघडी खाली निरसतेचे काटे असू शकतात. सहज कवि नैसर्गिक किंवा स्वाभाविक वाटतो.
आत्मसाधनारत मुनिवर्यांनी आपल्या काव्यातून अवध्य आध्यात्मिक प्रवृत्ती दिसली तर नवल नाही. “सहजसाक्षी भाव से, बस/सब कुछ संवेदित है" (पृ.२५१); "प्रभु से अर्थ की माँग करना भी/व्यर्थ है ना !"(पृ.२५३); “अर्थ की आँखें/परमार्थ को देख नहीं सकतीं"(पृ.१९२) या ओळी अध्यात्म सांगणाऱ्या आहेत. अध्यात्मामध्ये दोन गोष्टी येतात, एक मिथ्यात्वरागादि समस्त विकल्प समूहाचा त्याग आणि दुसरी निजशुद्धात्म्याचे अनुष्ठान.
रागादित्यागाची पुष्टीकरणाऱ्या या ओळी पहा : "...अहंकार को सन्तोष कहाँ ?"(पृ.३३९); "बिना सन्तोष, जीवन सदोष है" (पृ.३३९); “असंयमी संयमी को क्या देगा ?"(पृ.२६९); “पाप-पाखण्ड पर प्रहार करो" (पृ.२४३); "भोग-लीन भोक्ता को भी/तृप्त नहीं कर पाती हैं" (पृ.२६४); " 'मैं' यानी अहं को/दोगला-कर दो समाप्त"(पृ. १७५); "राग-रोष आदि वैभाविक/अध्यवसान का कारण है'(पृ.१६१).
अध्यात्माची सृष्टि करणाऱ्या या ओळी पहा : “स्व की याद ही/स्व-दया है"(पृ. ३८); "हो अपना, लो,अपनालो उसे!''(पृ.१२४); “अपना स्वामी आप है''(पृ.१८५); “दम सुख है, सुख का स्रोत''(पृ.१०२); “अपने आप में भावित होना ही/मोक्ष का धाम है" (पृ.१०९-११०); “परम-केन्द्र की ओर देखने से/चेतन का जतन होता