________________
(५३) रूपं । तस्य सिद्धिरुत्पत्तिईप्तिर्वा । नहि क्षणिककान्त उत्पत्तिर्घटते का रणत्वेन अभिमतक्षणस्य क्षणिकत्वेन सर्वथा नष्टत्वात् । कार्यत्वेनाभिमत. क्षणस्य च सर्वथाऽलब्धात्मलाभतया असत्त्वात् । न चासत् खरविषाणतुल्यं कस्यचित्कारणं कार्य वा युक्तं अतिप्रसंगात् । नापि नित्यैकान्ते सा घटते । सर्वथा अविकारिणः खपुष्पवत्कार्यकारणभावाभावात् तत्र उत्प. त्यनुपपत्तेः । अत एव ज्ञाप्तिराप क्षणिकायेकान्ते दुर्घटा । उत्पन्न हि प्रमाणं ज्ञापकं भवति । न तदेकान्ते उत्पत्तिः सम्भवतीत्युक्तं । . मराठी अर्थ:--प्रत्यक्षज्ञानी अशा सुमति तीर्थकराचें नांव भगदी अन्वर्थ होते. कारण, सुमति मणजे चांगली-वस्तुस्वरूपास यथार्थ जाणणारी आहे बुद्धि ज्याची तो. असा अर्थ या सुमति शब्दाचा आहे. व हे जिनपति प्रत्यक्षवेदी असल्यामुळे यांना हे सुमति असें नांव अगदी योग्य होते. तसेच यांनी ज्या मताचा अंगिकार केला होता ज्या मताचा. यांनी प्रसार केला होता, ते मत सुयुक्ति--अखंड्य अशा युक्तींनी स्थापिले होते. अर्थात् जीवादि पदार्थांमध्ये अनेक धर्म आहेत. परंतु वक्त्याची जो धर्म वर्णन करण्याची इच्छा असते, त्यावे. ळेस तो धर्म त्या पदाथामध्ये मुख्य रीतीने मानला जातो व इतर धर्म त्यावेळेस गौण समजले जातात. कारण, त्यावेळेस इतर गुणांचे प्रदर्शन करण्याची वक्त्याची इच्छा नसते. अशा रीतीने जीवादिगत धर्माची सिद्धि होते व ती सुयुक्तिपरिप्लुत आहे. तसेच प्रत्यक्ष व परोक्ष प्रमाणांनीही या पदाथांची सिद्धि होते. यामुळे सुमति जिनेश्वराचे मत उत्कृष्ट आहे हे सिद्ध होते. तसेच हे जिनेश दुसऱ्यांच्या मतामध्ये बौद्ध, नैयायिक इत्यादिकांच्या सर्वथा अनित्य व नित्य पदार्थाना मानणारांच्या मतामध्ये सर्व क्रिया व कारक यांच्या स्वरूपांची उत्पत्ति व ज्ञान होत नाही. याचे स्पष्टीकरण-चौद्ध हे
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org