________________
(५४) सर्वथा सर्व वस्तु क्षणिक आहेत अमें प्रतिपादन करतात. यामुळे क्षणिकैकांतमतामध्ये कार्यरूप पदार्थ व कारणरूप पदार्थ या दोघांचीही सिद्धि होत नाही. कारण, आपण ज्याला कारण ह्मणतो तेंही क्षणिक असल्याने कार्य उत्पन्न होण्यापूर्वी सर्वथा नाश पावतें. व कारणाचा बिलकुल नाश झाल्यामुळे कार्याची उत्पत्ति व्हावयाचीच नाहीं तें हमेशा गाढवाच्या शिंगाप्रमाणे असत् समजले जाईल. गाढवाचे शिंग ही वस्तु जशी जगांत नाही तद्वत कार्य देखील जगांत उत्पन्न होणार नाही. कारणाचा जर निरन्वय नाश मानला तर त्यापासून कार्यांची उत्पत्ति होत नाही. तसेंच पदार्थ जर सर्वथा क्षणिक मानला तर तो कोणाचे कारण अथवा कोणाचे कार्य होउ शकत नाही. जसें गाढवाचे शिंग सर्वथा असत् असल्याने ते कशाचे कार्य व कारणही होऊ शकत नाही. ... नैयायिक व सांख्य हे पदार्थ नित्य मानतात. पदार्थ नित्य मानल्याने देखील. त्यामध्ये कार्यकारण भाव सिद्ध होत नाही. कारण सर्वथा नित्य पदार्थांमध्ये विकार-परिणति होत नसल्यामुळे तो पदार्थ हमेशा एकाच अवस्थेत राहील. - बौद्धमतामध्ये पदार्थांचे ज्ञानही होऊ शकत नाही. कारण त्यांनी ज्ञान उत्पन्न होण्यास पदार्थांना कारण मानले आहे. पदाथांच्या अभावी ज्ञान होऊ शकत नाही. जसें घागर नेत्राला दिसली मणजे तिचे आपणास ज्ञान होते व ती दिसली नाही तर तिचे ज्ञान होणार नाही. परंतु यांच्यामते सर्व पदार्थ क्षणिक असल्यामुळे ज्ञान होणार कसे ? पदार्थ पहिल्या क्षणी उत्पन्न झाला त्यावेळेस ज्ञान होऊ शकत नाही. पहिला क्षण त्याच्या उत्पत्तींतच नष्ट झाल्यामुळे तो ज्ञानास कारण होऊ शकत नाही; व दुसऱ्या क्षणी पदार्थ नाश पावतो यामुळेही तो पदार्थ
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org