________________
( ५१ ) तापप्रबंधस्य प्रवृत्तः । ननु विषयसुखं प्राप्य संतापविवर्जिता जनस्य स्थितिभविष्यति इत्याह, सुखतो नच स्थितिः । मुखतः सम्प्राप्तविषयसुखलवात् अस्य जनस्य नच नैव स्थितिः सुखेनावस्थानं पुनः संतापप्रबंधप्रवृत्तः । इति एवं । प्रभोऽभिनंदन स्वामिन् । लोकहितं लोकेभ्यो हितं उपकारकं यतो यस्मात्कारणात्त्वदीयं मतं । ततः कारणाबानेव गतिः शरणं । सतां विवेकिना मुक्यर्थिनां । मतः संद्भिरभिप्रेत इत्यर्थः । मतिबुद्धिपूजार्थाच्चेति सम्प्रति क्तः तद्योगे सतामित्यत्र 'भवती ' त्यनेन कर्तृता । कर्तरि ता ।
चतुर्थः स्वयम्भूः समाप्तः।
मराठी अर्थः-संसारी लोकांच्यामागे लागलेली ही विषयाभिलाषा त्यांना दुःख देते. इतकेच नव्हे तर या विषयाशेपासून उत्तरोत्तर इच्छा वाढत जाते. द्रव्य, घर व सुंदर स्त्री एतद्विषयक इच्छा उत्तरोत्तर ते पदार्थ मिळाले असतां वाढत जाते व त्यामुळे समाधान रहात नाही ह्मणून दुःख होते. जे विषयभोगाचे पदार्थ आपल्याला मिळाले नसतात ते मिळविण्यासाठी आपली सारखी धडपड चाललेली असते. यामुळे ही दुःख होते व ते पदार्थ मिळाले असता त्यांचे संरक्षण करण्याची चिंता हमेशा उत्पन्न होते. यामुळे विषयाशा दुःखद आहे हे सिद्ध होते. तसेंच थोड्याशा वैषयिक सुखाची प्राप्ति झाली अणजे संसारी जीव कायमचे सुखी होतात असेंही नाही. पुनः त्यांना अभिलाधेपासून दुःख होऊ लागतेच. यासाठी हे प्रभो ! आपले सर्व जनांचे कल्याण करणारे मत आहे ह्मणून सर्व विवेकी जीवांचे रक्षण करण्यास आपणच समर्थ आहांत.
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org