________________
मांसकमतं निरस्तं । कथं तदत्राणमित्याह अहंक्रियाभिरित्यादि । अहमस्य सर्वस्य स्वयादिविषयस्य स्वामीति क्रिया अहक्रियाः ताभिः प्रतक्तः संलग्नः प्रवृत्तो वा मिथ्या असत्योऽध्यवसायोऽभिनिवेशः स एवं दोषो यस्य तत्तथोक्तं । अतएव जन्मजरातकात्तं तज्जगत् । जन्म प्रादुभावो, जरा वृद्धत्वं, अन्तको मरणं, तैरात्तं पीडितं । तदित्थंभूतं जगल्कि कृतवान्भगवानिस्याह । निरंजनामिन्यादि । शान्ति परमकल्याणं । अजींगमस्त्वं । इदं जगत्प्रापितास्त्वं । कथम्भूतां ? निरंजनां अंमनात्कर्ममलानिष्क्रांतं तद्वा निष्क्रांतं यस्याः सा निरंजना तां । मुक्तिरूपामित्यर्थः ।
मराठी अर्थः हे दिसणारे सर्व जगत् (प्राण्यांचा समूह) अनित्यक्षणांत नाश पावणारे आहे अर्थात् स्वप्नांत दिसणा-या पदार्थाप्रमाणे लौकरच नाश पावणारे आहे, या जगांतील कोणत्याही प्राण्यांचा कोणी संरक्षक नाही. आयुकर्म जोपर्यंत या जीयांस एका शरीरामध्ये कोंडून ठेवतें तोपर्यंत हे जीव या शरीरामध्ये राहतात व त्याचा क्षय झाला ह्मणजे त्या जीवांचे एक क्षम पर्यंतही इंद्रादिक शक्तिशाली देव रक्षण करूं शकत नाही. यास्तव या जगाचा कोणीही संरक्षक नाही. तसेच हे जगत् स्त्रीपुत्र द्रव्य इत्यादिकांचा मी स्वामी आहे अशा मिथ्या कल्पनेर्ने दषित झालेले आहे. व हे जगत् पुनर्जन्म, जरा क मरण या तीन भयंकर दुःखांनी हमेशा पीडित झालेले आहे. हे जिनेश सम्भवनाथ ! अशा जगतास आपण धर्मोपदेश करून त्यास मोक्षमार्ग दाखविला; त्यायोगें या जगताने कर्ममलरहित अशा शान्ति सुखाची प्राप्ति करून घेतली.
भावार्थः-या श्लोकांत स्तुतिकाराने जगाचे स्वरूप दाखविलें आहे. ते दाखवितांना प्रथम त्याविषयी हे जगत् अनित्य आहे असे. त्याने बटले आहे. असे झणण्याचे कारण हे आहे
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org