________________
१.)
आहे. हे स्पष्टीकरण राजवार्तिक, श्लेषार्तिक, प्रमेयकमलमार्तण्ड, हस्त्र इत्यादि ांच्या आधारें लिहिलें आहे.
श्रीमान पं. वंशीधरजी हे माझे विद्यागुरु आहेत, त्यांच्या कृपे - मुळे मी या ग्रंथाचें भाषांतर करण्यास यथाशक्ति समर्थ झालों यास्तव त्यांचा मी अत्यंत ऋणी आहे. तसेंच श्रीमान रावजी सखाराम दोशी यांच्या प्रेरणेनें हें अनुवादाचें कार्य हातीं घेऊन तें मी पूर्ण केलें. या ग्रंथाचे प्रकाशन करून त्यांनी जैन समाजास ऋणी करून ठेविलें यास्तव त्यांचा मी फार आभारी आहे.
माझ्या या कृतींत बरेच दोष असण्याचा संभव आहे. तथापि मनुष्य हा चुकीस पात्र आहे असें समजून वाचकांनीं क्षमा करावी अशी माझी त्यांना सविनय प्रार्थना आहे.
जिनदास पार्श्वनाथ फडकुले.
सोलापूर, पौष शुक्ल सप्तमी रविवार वीरनिर्वाण २४४७ विक्रम संवत् १९७६
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org