________________
स्वामी समन्तभद्राचार्य।
परोपकारी मनुष्यांचे जीवन जगाचे कल्याण करण्याकरिता असते. परोपकारी माणसे आपल्या कृत्यांनी जगास हमेशा ऋणी करून सोडतात. अशांचे जीवनचरित्र जगास आदर्शभूत असते. सत्पुरुषांची कृत्ये हीच त्यांची स्मारके होत. सत्पुरुष जरी कालाच्या अनंत उदरामध्ये गडप झाले तरी त्यांच्या सत्कृत्यांचा नाश कालाला कधीही करितां येत नाही. ती हमेशा सूर्यप्रकाशाप्रमाणे सर्व जगाच्या नेत्रांना जगाच्या अंतापर्यंत दिपवित असतात. सत्पुरुषांचे शरीर हे क्षणभंगुर आहे. परंतु त्यांचे गुण कल्पकालपर्यंत राहतात. त्यांचा केव्हाही नाश होत नसतो. 'शरीरं क्षणविध्वंसि कल्पांतस्थायिनो गुणाः ' ही कव्युक्ति वर लिहिलेल्या वचनाचे सत्यत्व पटवितें...
दिगंबर जैन धर्मामध्ये त्याच्या प्रारंभापासून आजपर्यंत असंख्यात सत्पुरुष होऊन गेले आहेत. त्यांची कीर्ति अजरामर झाली आहे. सत्पु. रुषांच्या मालिकेमध्ये भगवान समन्तभद्र उत्पन्न झाले होते. दिगंबर जैन धर्मामध्ये हे सर्वोच्च स्थानावर विराजमान झाले आहेत. . ___ यांनी आपल्या विद्वत्तेने जैनधर्माची उन्नति केली. अनेक भिन्नमतीय विद्वानांशी वाद करून त्यांना जैनधर्माचे महत्व दाखवून दिले. भगवत् समंतभद्राचार्यानंतर जे प्रसिद्ध विद्वान आचार्य झाले त्यांनी आपल्या ग्रंथांतून भगवत् समंतभद्राचार्यांची प्रशंसा केली आहे. पूज्य. पादाचार्यांनी जैनेंद्र व्याकरण लिहिले आहे. त्यांत ' चतुष्टयं समन्तभद्रस्य ' या सूत्रानें समन्तभद्र आचार्यांचा उल्लेख केला आहे.
हरीवंशकार जिनसेनाचार्यांनी समंतभद्रांची वाणी महावीर तीर्थकरांच्या वाणीप्रमाणे आहे असे मटले आहे.
जीवसिद्धिविधायीह कृतयुक्त्यनुशासनम् ।
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org