________________
(1)
जिनगुण वर्णनच न करितां प्रथकार समंतभद्राचार्यांनी अनेक तात्विक विषयांचे सुंदर वर्णन केले आहे. यामुळे हे स्तोत्र अद्वितीय आहे. असे traiter हरकत नाही. जैन, पदार्थांचे स्वरूप कसे. मानितात व tailer स्याद्वाद काय आहे हे या स्तोत्रांत उसम रीतीने प्रतिपादिले आहे. साहित्य दृष्टीनें विचार केला तर यांत त्याही प्रकारचे वणिन केलेले तज्ज्ञांस आढळून येईल, धर्म, न्याय, साहित्य व व्याकरण या सर्व दृष्टीनें हैं स्तोत्र अत्युत्तम आहे. या स्तोत्राच्या शेषटच्या श्लोकांतील चौथ्या चरणामध्ये ग्रंथकाराने आपले नांव प्रकट केल आहे. तें असें ' तब देव मतं समंतभद्रं सकलं ! यावरून हे स्तोत समंतभद्र आचार्यांनी लिहिल आहे हे व्यक्त होतं. या स्तोत्राच्या रचनेचा इतिहास समंतभद्राचायांच्या चरियमध्ये लिहिला आहे.
या स्तोत्रावर प्रभाचंद्राचार्यांनी लहानशी पण अभिप्रायपूर्ण अशी टीका लिहिली आहे. या प्रभाचंद्राचार्यांनी प्रमेयकमलमाड व न्यायकुमुदचंद्रोदय या सारखे प्रचंड तर्कग्रंथ लिहिले आहेत. स्वयंभू स्तो. atter प्रशस्तीचा लोक व प्रमेयकमलमाडाच्या प्रशस्तीचा लोक यांची समानता साळे या दोन्ही ग्रंथांचा कती एकच आहे असें अनु मान करावयाला कोणती हरकत नाही. तसेच स्वयंभू स्तोत्रांतील तात्विक प्रतिपादन करणाऱ्या लोकांची टीका या आचायांनी मोठ्या खुबीनें लिहिली आहे. यावरूनही या प्रथांचा कता एकच असावा असें वाटते. श्री जिनसेन आचायांनी मोठ्या गौरवाने आदिपुराणामध्ये या आचार्यांचा उल्लेख केला आहे. अकलंक, माणिक्यनंदी. विद्यानंदि, प्रभाचंद्र, जिनसेन इत्यादिक आचार्य समकालीन झाले आहेत.
आचार्य प्रमाचद्रांनी अकलंक. विद्यानंद व समन्तभद्र यांचं स्मरण केले आहे. प्रभाचंद्राचार्यांचा अस्तित्वकाल विक्रमाचे नववें शतक मामलें जातें.
स्वयंभू स्तोत्राचा अनुवाद कस्तांना कोठें कोठें विशेष स्पष्टीकरण केलें
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org