________________
नधिकारास दूर पळविले आहे. असे श्री आदिनाथ भगवान् या भूतलावर चिरकाल नांदले.
असा या श्लोकाचा शब्दशः अर्थ झाला. या पहिल्या श्लोकामध्ये प्रथमतःच स्वयंमु हा शब्द आला आहेव त्याचा खुलासाही अर्थ लिहितांना झाला आहे. हणजे तीर्थकरांना जन्मतः तीन ज्ञानें। मति, श्रुति व अवधि ही ] असतात. यामुळे त्यांना दुसऱ्याच्या उपदेशाशिवाय. मोक्षमार्गाचं स्वरूप समजलेले असते व त्यामुळे ते दुसन्याच्या साहायाशिवाय रत्नत्रयाची प्राप्ति करून घेतात. यानांच प्रत्येकबुद्ध असेंही झटल्यास काही हरकत नाही. कोणत्याही विद्वानाजवळ शिकावे लागत नाही. तसेंच आय भगवान यांनी स्वतः आपल्या शंभर मुलांना नानात-हेच्या विद्या व शास्त्रे शिकविली यावरूनही ते स्वयंभु होते हे सिद्ध झाले. . . तसेच याच श्लोकांत दुसरा शब्द 'भूतहितेन' हा आहे. व याचा अर्थ प्राणिमात्रांना हिताचा उपदेश देणारे असा होतो. आतां तो उपदेश प्राणिमात्राविषयी प्रेमभाव किंवा दयाभाम असल्यावांचन होणे शक्य नाही. व ज्यांना केवलज्ञान उत्पन्न झाले आहे त्यांच्या मोहनीय कर्माचाही नाश झालेला असतो व दयाभाव उत्पन्न होणे हैं मोहविशेषाचे कार्य आहे. अर्थात् केवलींच्या टिकाणी मोहाच्या अभावामुळे मोहापाडून उत्पन्न होणाऱ्या प्रीति परिणामाचा व दयेचाही अभाव होतो व त्यांचा सर्व पदार्थामध्ये उपेक्षाभाव असतो. कारण, रागद्वेषाचा अ. भाव झाल्यामुळे ते कृतकृत्य झाले आहेत व मामुळे त्यांचा उपेक्षाभावच असतो. तेव्हां त्यांना परमकारुणिक, भूतहित वगैरे विशेषणे लावणे कसे योग्य होईल अशी साहजिक शंका हृदयांत उत्पन्न होते परंतु थोडासा विचार केल्यास या शं
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org