________________
( १७ )
रीतीने पाळूं शकतात. अन्य मतांतील साधूंना ही केव्हाही पूर्णपणे पाळिता येणार नाही. जेये अणु एवढाहि परिग्रह व आरंभ असेल तेथें ही पाळिली जाणार नाहीं. इर्चे पूर्ण पालन करिता यावे ह्मणून भगवंतांनी दोन्ही परिग्रहांचा त्याग केला. विकार उत्पन्न होईल असा वेष यांनी धारण केला नाहीं. यांनीं मदनावर विजय मिळविला. क्रोधादिक विकार नाहींसें करून आत्मा दर्पणाप्रमाणें निर्मल केला. २३७
२२ यांचें अरिष्टनेमि हे नांव सार्थक होतें. नेमि धांव चाकाच्या धावेखालीं सांपडलेल्या पदार्थांचा जसा चुराडा होतो तद्वत् कर्माचा चुराडा करण्यास हे चाकाच्या धावेंप्रमाणे असत. हे हरिवंशाचे भूषण होते, व यांनी इंद्रियविजय कसा करावा हें जनतेला आपल्या आचरणाने दाखविलें. अतींद्रिय, अनंत पदार्थांना एकदम स्पष्टपणें जाणणारे व पाहणारें ज्ञान यांनी मिळविलें होतें. यांच्या चिरसंबासानें अत्यंत पवित्र झालेला असा ऊर्जयंत पर्वत अत्यंत भक्तिवश झालेल्या भव्याकडून वंदिला जातो. २४६ २३ पार्श्वनाथ तीर्थकर अत्यंत धीर होत. दुष्ट अशा एका देवानें घोर उपद्रव केला, तथापि तिळमात्रहि हे आपल्या परमात्म ध्यानापासून डगमगले नाहीत. धरणेंद्रानें आपला फणामंडप यांच्या मस्तकावर पसरून उपसर्ग निवारण केला व आपल्या अलोट भक्तीचा जगाला चांगला परिचय आणून दिला. भगवंतांनी अनेक मिध्यात्वी तपख्यांना जैन मुनि बनविलें. २५६
२४ भव्यांच्या पापांचा नाश करणारें व त्यांना गुणपरि पूर्ण बनविणारें महावीरस्वामीचें शासन या कलिकालामध्येहि विजय पावतें. यांचं मत समंतभद्र अर्थात् सर्व बाजूनें कल्याण करणारें आहे. कां कीं तें स्याद्वादरूप आहे.
२६२
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org