________________
भाही असे समजून हे विरक्त झाले. - १८ अर जिनाचे सौन्दर्य दोन डोळ्याने पाहून इन्द्र तृप्त झाला नाही यास्तव त्याने हजार डोळे उत्पन्न करून त्यांचे सौन्दर्य आश्चर्यचकित होऊन पाहिले. अर जिनेश्वरांनी आपल्या शरीराच्या कांतीनें बाहेरील अंधकार नाहींसा केला. आपल्या ध्यानरूपी तेजानें अंतःकरणांतील अंधारही नाहीसा केला. अरजिनांनी स्याद्वादाचे स्वरूप जगाला दाखऊन दिले. अनेकांत हा सर्वथा अनेकांत नाहीं तो कथंचित् एकांत व कथंचित् अनेकांत आहे. प्रमाणाचे दृष्टीने तो अनेकांत आहे व नयाच्या दृष्टीने तो एकांत आहे. १९८
१९ मल्लिनाथ तीर्थकर प्रत्यक्षज्ञानी होते. स्याद्वादाने भरलेली त्यांची वाणी मुनिजनांना आनंदित करीत असे. अन्यमतीय विद्वान् त्यांच्याशी वाद करण्यास असमर्थ असत. शिष्यांनी वेष्टिलेले हे जिनेश प्रहांनी वेष्टिलेल्या चंद्राप्रमाणे शोभत असत.
२२६ २० यांनी मुनींच्या व्रतांचा पूर्ण निर्णय केला होता ह्मणून यांचे मुनिसुव्रत हे नांव अगदी योग्य होते. हे सर्व मुनीमध्ये श्रेष्ठ व समवस. रणामध्ये मुनिवृदांनी हमेशा वेष्टिलेले असत. यांचे शरीर इतकें सौम्य दिसत होते की जणू मूर्तिमंत क्षमेचा पुंजच आपल्या पुढे उभा राहिला आहे, जणू साक्षात् तपश्चरणच आपल्या पुढे उभा राहिले आहे असे वाटत असे. यांची वाणी मधुर व मत लोककल्याणतत्पर होते. २३२
२१ नमि जिनपति मोक्षमार्गाचा उपदेश करीत असत, सर्व तत्वांचे त्यांना पूर्ण ज्ञान झाले होते व त्यांनी कर्माचा बीमोड करून टाकिला होता. यांनी पदार्थांच्या धर्माचे-स्वभावांचे स्यादस्ति, स्यान्नास्ति इत्यदि सात प्रकारांनी वर्णन केले. अनेक नयांचा आधार घेऊन वस्तूंचे धर्म भव्यांच्या मनश्चक्षु पुढे यांनी उभे केले. पूर्णपणे अहिंसा पाळली गेल्यानेच ब्रह्मपदाची प्राप्ति होते. ही अहिंसा जैनसाधूच पूर्ण
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org