________________
(३५)
१६०
कवा अशुभ होण्यास बाह्यवस्तु देखील कारण असते असें वासुपूज्य .. जिनाच्या स्तोत्रांत सांगितले आहे.
..... १५२ .१३ वस्तु सर्वथा एकधर्मात्मकच आहे असे वर्णन करणारे नय वस्तूंची सिद्धि करू शकत नाहीत. अशा नयांना कुनय ह्मणतात. - स्याद्वादाचा आश्रय घेणारे नय पदार्थांची सिद्धि करितात. कारण, वस्तूंतील ज्या धर्माचे वर्णन ते करितात त्याला ते मुख्यता देतात, व तिच्यांतील इतर धांना गौण समजतात परंतु त्यांचा निषेध करीत नाहीत, यामुळे त्यांना सत्य नय ह्मणतात; असे विमल जिनेश्वरांनी सांगितले आहे.
१४ अनंत दोषांचे उत्पत्तिस्थान असा मोह यांनी जिंकिला यास्तव यांचे अनंत हे नांव सार्थक आहे. या जिनेश्वरांनी आशारूपी नदी परिग्रह-त्यागरूपी सूर्यकिरणानी शुष्क केली. अनंत झणजे संसार हा यांनी जिंकिला यास्तव यांना अनंतजित् ह्मणतात. १७२
१५ धर्मतीर्थकरांचे धर्म हे नांव सार्थक आहे. कारण, यांनी .... धर्माचा व त्याचे स्वरूप वर्णन करणाऱ्या आगमाचाही प्रसार केला. . या तीर्थकरांनी स्वतःला व भव्य जीवांना सुखी केलें यास्तव यांना
शंकर असें हि नांव आहे. ... १६ शांति तीर्थकरांनी सिंहासनस्थ असतांना प्रजेमध्ये शांति उत्पन्न केली व मुनि झाल्यावर पापशांति केली, मोहाचा नाश केला. हे शांति जिनेश्वर शरण आलेल्या भव्यांचे संसारदुःख शमवितात असें यांचे वर्णन आहे.
१८५ १७ कुंथु वगैरे सूक्ष्म प्राण्यावर हे दया करितात यास्तव यांचे कुंथु हे नांव अन्वर्थक आहे. आशाग्नीच्या ज्याला इष्ट वस्तुंच्या प्राप्तीने सतत वाढत जातात. सुंदर वस्तूच्या प्राप्तीने शरीराचा संताप नाहीसा होऊन ते शांत होते, परंतु आत्म्याची यांच्या योगें केव्हाही तृप्ति होत
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org