________________
( ३३ )
स्वयंभूस्तोत्रांतील स्तुतींची अनुक्रमणिका.
विषय.
पृष्ठ.
१ प्रथम तीर्थकरांनीं कर्मभूमि प्रारंभीं जें कार्य केलें त्याचें वर्णन १
२ अजित नांवाची सार्थकता
१५
३ संभव नाथांनी लोकांना कसें सुखी केलें याचे वर्णन.
२४
४ गुण ह्मणजे दया. हिच्या पालनासाठीं अभिनंदन जिनांनीं दोन्ही परिग्रहांचा त्याग केला, व रागद्वेषांचा त्याग केला; ह्मणजे, खऱ्या दयागुणाची प्राप्ति होते असे सांगितलें. रागद्वेषामुळेच निर्दयता उत्पन्न होते व तीच दुःखाला कारण आहे असेंही त्यांनी सांगितलें. ३९
५ स्याद्वादाचे अनुसरण केल्यानें आपलें मत सुंदर झालें आहे. अन्य एकांत मतामध्ये कारकादि व्यवस्था होणें असंभव आहे असें सुमति जिनांनीं सांगितलें आहे.
५२
६. पद्म ह्मणजे कमल त्याचा विकास करणारे हे पद्मप्रभ होत. भ• थवा पद्मा ह्मणजे लक्ष्मी अगर शोभा; तिचें पहिलें स्वरूप सरस्वती - रूपाने प्रगट होतें. त्याचा पूर्ण विकास झाला ह्मणजे सर्वज्ञता प्राप्त होतें. भेददृष्टीनें पाहणारे लोक सर्वज्ञतेबरोबर प्राप्त होणान्या विभूतीला लक्ष्मी मानतात. पण वास्तविक पाहिलें असतां आपल्याशीं सतत अविनाभावी संबंध ठेवणारी जी लक्ष्मी ती सर्वज्ञतेखेरीज दुसरी नव्हे. विद्या अगर ज्ञानाच्या दृष्टीनें तीच विभूति सर्वज्ञता या नांवानें संबोधिली जाते; आणि तिलाच ऐश्वर्याच्या दृष्टीनें लक्ष्मी ह्मणतात. अशी वास्तविक व परिपूर्ण लक्ष्मी पद्मप्रभ देवास प्राप्त झाली. ७२
७ आपले पार्श्वभाग ह्मणजे आजूबाजूची परिस्थिती सुंदर कशानें होते याचे कारण दाखविण्याचे हेतूनें सुपार्श्व तीर्थकरांनी असें वर्णन किलें कीं, भोग हे रोग आहेत, त्यांच्या कारणभूत विषयसामग्रीला बाजूस सारून आपल्या भोवतालची परिस्थिति शुद्ध केल्यानें स्वास्थ्य
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org