________________
साधूंना त्यांचे भक्त उत्तम आहार देत असत. हे आंचायर्यांनी पाहिले व त्यांनी बौद्धवेष सोडून दिला. आणि ते वैष्णव साधु बनले. परंतु येथेंहि त्यांना भस्मक रोग विनाशक आहार न मिळाल्यामुळे त्यांना येथून हे योग्य आहारप्रप्ति करण्यास्तव जावे लागले. या रोगाची
शांति करण्यासाठी त्यांना अनेक देश फिगवे लागले. - त्यांनी रोगविनाशाचे उपाय करण्यासाठी जरी अनेक वेष धारण • केले तथापि त्यांनी आपले सम्यक्त्व मलिन किंवा नष्ट केले नाही. हे . बाहेरून वेषांतर केलेले दिसत असत परंतु त्यांचे अन्तःकरण सम्यक्त्वाच्या प्रकाशाने अत्यंत उज्ज्वल झाले होते. यावेळस त्यांचे स्वरूप, चिखलाने भरल्यामुळे वरून मळकट पण आंतून तेजःपुंज असलेल्या मण्याप्रमाणे दिसत होते. काही दिवसांनी ते फिरत फिरत वाराणसी अर्थात् काशी येथे आले. तेथील साधु शिवभक्त असल्यामुळे त्यांनी शैव साधूंचा वेष धारण केला. या वेषाने फिरत असता त्या शहरांत शिवकोटी राजाने बांधलेले एक मोठे शिवमंदिर त्यांच्या दृष्टीस पडले. तेथे महादेवाच्या पुढे अर्पण केलेला रसभरित पक्कान्नांचा नैवद्य पाहून या ठिकाणी अशा तन्हचे पकान आपणास खावयास मिळाल्यास आपला रोग निःसंशय बरा होईल. असा विचार करून त्यांनी देवळामध्ये प्रवेश केला. व तेथील पुजायास हा महादेवास अर्पण केलेला नैवेद्याचा राशि त्यास तुझी खाऊ घालू शकत नाही काय? असे विचारिलें. आही असमर्थ आहोत असें पुजा. यांनी सांगितल्यावर आचार्यांनी मी महादेवास हा सर्व नैवेद्यराशि खात्रीने खाऊ घालू शकेन असें मटले. आचार्यांचे हे अद्भुत व अश्रुतपूर्व भाषण ऐकून त्यांना फार आश्चर्य वाटले. काही पुजाऱ्यांनी त्याचवेळेस राजाला ही हकीकत कळविली. राजाला साश्चर्य आनंद वाटला व त्याने पुनः महादेवास अर्पण करण्यासाठी पुष्कळसा नैवेद्य आपल्या. बरोबर घेतला आणि तो तेथे आला. महाराज ! आपण महादेवाला हा सर्व नैवेद्य खाऊ घालाल काय ? असा त्याने आचार्यांना प्रश्न केला.
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org