________________
घेतल्यावर त्यांना काय काय आपत्ति भोगाव्या लागल्या व त्या आपत्तींचा नाश करून त्यांनी कशा रीतीनें जैनधर्माची प्रभावना केली हे दाखऊं.
दक्षिण प्रांतांत कांची नांवाचे शहर आहे. तेथें न्याय, व्याकरण, काव्य, साहित्य व धर्मशास्त्र यामध्ये अद्वितीय निपुण असे समंतभद्र नांवाचे विद्वान मुनि राहत असत. जसे ते विद्वान् होते तसेच ते चारित्रवाहि होते. ते निर्दोष चारित्र पाळीत असतां वेदनीय कमाच्या जबरदस्त उदयाने जेवलेले अन्न लागलीच भस्म करणारा असा दुः खद भस्मक या नांवाचा रोग त्यांना झाला. त्या रोगाने त्यांना अति. शय वेदना होऊ लागल्या तेव्हा त्यांच्या मनांत तशावेळीहि 'अरेरे या रोगाने मी फार पीडित झालो असल्यामुळे जैनधर्माची प्रमावना करण्यास असमर्थ झालों ना ? मी या रोगाची दुःसह वेदना सोसण्यास समर्थ आहे. मला हा रोग झाल्याने विशेष वाईट वाटत नाही. प. रंतु जैनधर्माची प्रभावना करण्याची माझी उत्कट इच्छा मनांतल्याम. नांतच जिरून जाणार याबद्दल मला अत्यंत दुःख वाटतें' इत्यादि सद्विचार येऊ लागले. त्यांनी रोगाचा नाश ज्याने होईल तो विधि लौकर करावा असें मनांत आणिलें व तेथून निघून त्यांनी उत्तर दिशेकडे प्रयाण केले. ते पडेन्दु शहरास जाऊन पोहोंचले, तेथे बौद्धांची मोठी दान शाला होती. येथे आपणास यथेच्छ अन्न मिळेल व आपला रोग नाहीसा होईल या हेतूनें व रोगाच्या असह्यतेने मुनिधर्म पाळणे भशक्य झाल्यामुळे त्यांनी मुनिवष सोडून दिला व ते बौद्ध साधु बनले. परंतु येथेहि त्यांच्या रोगाचा उपशम करण्यासारखा आहार न मिळाल्यामुळे येथूनहि त्यांनी प्रयाण केले. उत्तर प्रांतांतील अनेक गां. वामध्ये ते गेले तथापि त्यांच्या रोगाचा नाश करण्यासारखें अन्न मि. ळाले नाही. व त्यांची भूक शांत झाली नाही. याप्रमाणे फिरत फिरत कित्येक दिवसांनी ते दशपुर शहरास गेले. त्या शहरांत वैष्णवांचा मठ होता, तथे पुष्कळसे वैष्णव साधु रहात असत. त्या
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org