________________
(२६)
समंतभद्र यांचा अस्तित्वकाल विक्रमाचे तिसरे किंवा चौथे शतक हे असावें असें अनुमान करता येईल. यतिवृषभाचार्यांच्या मागन कुन्दकुन्द व तदनंतर उमास्वामी झाले व तदनंतर समंतभद्राचार्य झाले. यावरून समंतभदाचार्यांचा अस्तित्वकाल विक्रमाचे तिसरें किंवा चौथे शतक असावे असे वाटते.
आचार्य समंतभद्रांचे शिवकोटि मुनि शिष्य होते. विक्रांतकौरव नाटकाच्या शेवटी प्रशस्तीत हस्तिमल्ल कवीने शिवकोटि मुनि आचार्यांचे शिष्य होते असे लिहिले आहे.
शिष्यौ तदीयौ शिवकोटिनामा । शिवायनः शास्त्रविदां वरेण्यौ ॥ कृत्स्नश्रुतं श्रीगणिपादमूले ।
ह्यधीतवन्तौ भवतः कृतार्थो ॥ ४ ॥ भगवान् जिनसेनांनी शिवकोटि मुनींनी भगवती आराधना ग्रंथ लिहिला आहे असें आदिपुराणामध्ये झटले आहे.
शीतीभूतं जगद्यस्य वाचाराध्यचतुष्टयम्
मोक्षमार्ग स पायानः शिवकोटिमुनीश्वरः ॥ अर्थ:-ज्यांच्या उपदेशाने दर्शन, ज्ञान,चारित्र व तप या चार आ. राधनारूपी मोक्षमार्गाचा आश्रय करून जग शांतस्वरूपी झाले. ते शिक्कोटि मुनीश्वर आमचे रक्षण करोत । ___ समंतभद्र आचार्यांची दिगंबर जैनधर्मातील विद्वानामध्ये किती ख्याति होती, त्यांनी कोणते ग्रंथ लिहून जैन समाजास ऋणी करून सोडलें, व ते केव्हां झाले या विषयांचा यथाशक्ति येथपर्यंत विवार केला. आतां आचार्यांचे चरित्राची पूर्वाचार्यांनी जी हकीकत लिहून ठेविली भआहे तिचा संक्षेपाने उल्लेख करूं.
आचार्य समंतभद्र हे क्षत्रिय होते, त्यांचे शांतिवर्मा असे नाव होते व ते राजपुत्र होते असे आह्मी मागे सप्रमाण सिद्ध केले आहे. आता त्यांनी दीक्षा
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org