________________
(२५) यतिवृषभाचार्य त्रैलोक्य प्रज्ञप्तिग्रंथाचे कर्ते होत. हे आचार्य कुंदकुंद आचार्यांच्याही पूर्वी झाले आहेत. कुंदकुंद आचार्यांनी पंचास्तिकाय समयसारांत ज्या गाथा संगृहीत केल्या आहेत त्यापैकी काही गाथा या ग्रंथांत आढळून येतात. तसेंच त्रैलोक्यसारामध्ये ही असलेल्या पुष्कळशा गाथा यामध्ये आढळल्या आहेत. ९८७ पासून ९९० पर्यंतच्या त्रैलोक्य सारांतील गाथा त्रैलोक्यप्रज्ञप्तीत आढळून येतात. यावरून त्रैलोक्य प्रज्ञप्तीचा संक्षेप त्रैलोक्यसार हा ग्रंथ असावा असे वाटते. असो. य. , तिवृषभाचार्यांचे शिष्य उच्चारणाचार्य या नांवाचे होते. या रीतीने चा. लत असलेल्या आचार्यपरंपरेमध्ये कुंदकुंद शहरामध्ये पद्मनंदि नांवाचे मुनि झाले. यांना कुंदकुन्दाचार्य असें ह्मणतात. तदनंतर काही कालाने शामकुंड आचार्य झाले. काही काल गेल्यानंतर तुम्बलूर गावामध्ये तुंबलूराचार्य नांवाचे मुनि झाले. व तदनंतर तार्किकसूर्य आचार्य समं. तभद्र हे झाले.
महावीरस्वामी मोक्षास गेल्यानंतर ६०५ वर्षे व पांच महिन्यांनी शकराजा अर्थात् शालिवाहन हा उत्पन्न झाला असा त्रैलोक्यसारामध्ये उल्लेख आला आहे. तो असा----
पण छस्सयवस्सं पण मासमुंद गमिय वीरणिचुइदो। सगराजो तो ककी चदुणवतियमहियसगमासं ॥ ८५० ॥
शालिवाहन शकाची ३९४ वर्षे झाल्यानंतर कल्की उत्पन्न झाला. , यावरून शालिवाहनाच्या ८३ व्या वर्षापर्यंत अंगज्ञान भारत वर्षामध्यें होते. विक्रम संवत् १३४ वर्षांनंतर शालिवाहन शकाला प्रारंभ होतो. अर्थात् ' महावीरस्वामी मोक्षास गेल्यानंतर ४७१ वर्षांनी विक्रम संवत सुरू झाला.. विक्रमसंवत २१२ वर्षेपर्यंत अंगज्ञानप्रवृत्ति होती. .
यावरून आपणांस असें दिसून येईल की यतिब भाचार्य, कुंदकुंद आचार्य, उमास्वाभी, समंतभद्र या आचार्यांचे अस्तित्य विक्रम संवत २१२ वर्षेपर्यंत नव्हते. अतिवृषभाचार्य कुंदकुंदाचार्य, उसास्वामी ५
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org