________________
( २२३ )
विशेष स्पष्टीकरण - एकांताचे दोन भेद आहेत सम्यगेकांत व मिथ्या एकांत . वस्तूच्या अनेक स्वभावांना विषय न करता एकाच स्वभावाला मुख्यतेनें जाणणार व इतर स्वभावांना त्या. वेळेस गौण समजणारे जे ज्ञान त्यास सम्यगेकांत ह्मणतात. या सम्यकांताला अनेकांत हाणण्याचे कारण हे आहे कीं हा एकांत, वस्तु एक स्वभावात्मकचें आहे, असें समजत नाहीं. एवढेच की, वस्तूंतील एका धर्माला मुख्य समजतो व तिच्या इतर धर्माला गौण समजतो. वस्तूच्या जेवढ्या अंशाला मुख्यता अनेकांत देतो तेवढाच अंश त्यावेळेस मुख्यतेनें या अनेकांताचा विषय असल्यामुळे मुख्यत्वाच्या दृष्टीने या अनेकांताला ' सम्यकांत' असें आह्मी ह्मणूं शकतो. व वस्तूच्या इतर स्वभावांचा निषेध न करतां त्यांना गौण मानीत असल्यामुळे या एकांतास अनेकांत असेंही ह्मणतां येते. व पदार्थात वि. वक्षित स्वभावाशिवाय दुसरे स्वभाव नाहींत असें समजणारें जे ज्ञान त्यास मिथ्यैकांत ह्मणतात. याप्रमाणे एकांताचें जसें दोन भेद आहेत तसेच अनेकांताचे देखील दोन आहेत. सम्यगनेकांत व मिथ्या अनेकांत, वस्तूच्या सर्व स्वभावांना सांगणारा युक्ति व आगम यांच्या योगें ज्याला बाधा येत नाहीं किंवा जो युक्ति १ आगम यांचे उल्लंघन न करतां त्यांना अनुकूल असतो तो सम्यगनेकांत होय. वस्तु एकानेक स्वभावात्मकच आहे असे मानणारा तो मिथ्या अनेकांत होय. या अनेकांताचे युक्ति व आगम या उभयतांबरोबर विळा भोपळ्या एवढे सख्य असतें. ह्मणून यास मिथ्या अनेकta ह्मणतात. तसेच सम्यगनेकांतास प्रमाण ह्मणतात व मिथ्या अनेकांतास प्रमाणाभास असें ह्मणतात. जर अनेकांत हा सर्वथा अनेकातच असतां तो कथंचित् एकांत न होता तर एकांताचा अ
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org