________________
जैनमतामध्ये पदार्थांचे वर्णन दोन रीतीने करितात. त्या दोन रीती द्रन्यार्थिक व पर्यायार्थिक या दोन नयाचा आश्रय घेतला हणजे सिद्ध होतात. वस्तूमध्ये सामान्य व विशेष असे धर्म आहेत. हे पर्यायार्थिक दृष्टीने वर्णन केले आहे. द्रव्यार्थिक दृष्टीने वस्तु अभेदस्वरूप आहे. यावरून वस्तु एकानेकात्मक आहे. अभेद दृष्टीने ती एक आहे; त्यावेळेस गुण पर्याय यांची कल्पना गौण होते. भेद दृष्टीने ज्यावेळेस आपण पदार्थाकडे पाहतो त्यावेळेस आपली अभेददृष्टी गौण होते व आपल्या नजरेसमोर गुण व पर्याय हे येत असतात. भेददृष्टीने वस्तुधर्म अनंत असल्यामुळे तेथें अनवस्था कशी? द्रव्यामध्ये सामान्य व विशेष हे दोन धर्म आहेत. यांच्यामध्ये अनुवृत्ति व व्यावृत्ति यांच्या योगे भेद उत्पन्न होतो. व तो भेद त्यांची भिन्न भिन्न कार्य होतात ह्मणून आहे. व त्यांची भिन्न भिन्न कार्ये देखील तशा त-हेच्या दोन पदार्थातील अनेक शक्तीमुळे होतात. व त्या शक्तिमध्येही सहकारी कारणांच्या सहायाने अनेकपणा येतो. तेव्हां यादृष्टीने विचार केल्यास अनवस्था उत्पन्न होते; परंतु ही दोषावह नाही. जेथें पदार्थामध्ये वास्तविक अनंत धर्म दिसून येतात तेथें अनवस्था काली ? परंतु मूळ पदार्थाची जेथे सिद्धि होत नाही व युक्तीचा आश्रयं न घेतां पदार्थपरं. परा कल्पना केली जाते तेथेच अनवस्था दोष मानला आहे. - संकर व व्यतिकर हेही दोष स्याद्वादामध्ये नाहीत. ज्या रीतीने पदार्थामध्ये आमी अस्तित्व स्वभाव मानतो त्याच रीतीने नास्तित्व स्वभावाची कल्पना आह्मी मानीत नाही. पदार्थामध्ये एकत्व ज्या रीताने मानतो त्याच रीतीने अनेकत्व आह्मी मानीत नाही. यामुळे संकर दोष आमच्या मतामध्ये शिरत नाही. एकत्व जसे द्रव्यार्थिक नयाने आह्मी मानतो.
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org