________________
(२१४)
अभाव आहे असे आह्मी प्रणतो. याप्रमाणे हे आठ दोष बनेकांत वादामध्ये उत्पन्न होतात. - वर जे अनेकांतवादामध्ये दोष दाखविलें ते खरोखरच त्यांत आहेत किंवा व्यर्थच त्याच्यामाथी ते लादले आहेत. हे पुढल्या विवेचनावरून स्पष्ट होते.
प्रथमतः विरोध दोष अनेकांतामध्ये आहे किंवा नाही हे पाहूं. वस्तूमध्ये अनेक धर्म आहेत. जसे एखादा वादी ज्यावेळेस परमताचे खंडन करतो त्यावेळेस त्याचे भाषण केवळ खंडन. परच असते असे नाही. जर त्याचे भाषण खंडनपरच मानले तर ते त्याच्या पक्षाचे देखील खण्डनच करील. परंतु असें नाही. त्याचे भाषण स्वपक्षाचे मण्डन करीत असते व इतरपक्षाचे खण्डन करीत असते. अर्थात या दोन स्वभावांनी भरलेले असते. एका मनुष्याचे अनेक व्यक्तींशी भिन्न भिन्न नाते असते. व निरनिराळ्या अपेक्षांनी सिद्ध होते. यामुळे ते युक्तियुक्त मानले जाते. व तसले आपेक्षिक स्वभाव त्यामध्ये आहेत हे सिद्ध होते. याचप्रमाणे वस्तूमध्ये अस्तित्व नास्तित्व वगैरे अनेक गुण आहेत. हे जरी विरुद्ध आहेतसे वाटते, परंतु अपेक्षांच्या सहायाने यांतील विरोध दूर करता येतो. विरोध त्या ठिकाणीच आढल्न येतो, जेथे जे नसते तेथे मानले झणजे. जसे गाढवाला शिंग नसतांनाही ते आहे असे मानल्याने. परंतु अस्तित्व नास्तित्व हे धर्म वस्तमध्ये आझाला अविरुद्ध असलेले आढळून येतात. यामुळे यामध्ये विरोध नाही. जसे घागर ही स्वरूपाने आहे व ती पटरूपानें नाहीं ह्मणजे कापडासारखी नाही. तेव्हां ती अमुक रीतीने आहे व अमुक रीतीनें नाहीं हे आपण प्रत्यक्ष तिचे स्वरूप पाहून देखील जाणू शकतो. ज्या रीतीने ती घागर अस्तित्व स्वभावाला धा
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org