________________
( २०९ )
मराठी अर्थ - हे प्रभो अर जिनेश ! प्राण्यांना अनन्त सुखाची प्राप्ति करून देण्यास कारण असलेलें दिव्यध्वनिरूप अमृत, संपूर्ण पदार्थांना प्रतिपादन करण्याच्या शक्तीनें युक्त आहे व तें सर्व भाषांमध्ये परिणत होतें. भिन्न भिन्न भाषा जाणणाऱ्या प्राण्यांना आपला दिव्यध्वनि सर्व भाषेत परिणत होतो असे झटलें आहे. अशा तऱ्हेचें हें वचनामृत संपूर्ण सम वसरणांत व्यापून राहते व तें अमृताप्रमाणे प्राण्यांना तृप्त करते सुखी करतें.
नन्वेकान्तेऽपि वाचो वास्तवार्थप्रतिपादकत्वेन प्राणिनां संवर्षकत्वसम्भवान्न कश्चिद्भवदीयवचोतिशयः सम्भवतत्यिाहएकान्त मतांत देखील एकान्ताचें स्वरूप दाखविणान्या वचनांनीं वस्तूंचें खरें स्वरूप समजतें व त्यापासून मनास आनंद होतो यास्तव आपल्याच वचनाला महत्व कसे देता येईल ? एकान्तवचन देखील महत्वाचे आहे या शंकेचें उत्तर ग्रन्थकार देतात.
अनेकान्तात्मदृष्टिस्ते सती शून्यो विपर्ययः || ततः सर्व मृषोक्तं स्या- .
तदयुक्तं स्वघाततः
अनेकान्तेत्यादि । ते तव या अनेकान्तात्मदृष्टिरनेकान्तात्मकं मतं सा सती सत्या 1 विपर्ययः एकान्तदृष्टिरूपः शून्योऽसत्यः । यथा चैकान्तोऽसत्यस्तथा ' अन्वर्थसंज्ञ' इत्यादौ प्ररूपितम् । ततः एकान्ताश्रयेण निरवशेषं मृषाऽसत्यमनृतमुक्तं स्यात् । कथं पोतं तत्स्यादिति चेत् तदयुक्तं यतस्तर्या एकान्तदृष्ट्या अयुक्तं सर्वं वक्तुमनुचितं । कुतस्तया तदयुक्तं ? स्वघाततः स्वशब्देन सदसदाद्येकान्तो गृह्यते । स्वस्य
Jain Educationa International
--
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org