________________
( २१०) घातः स्वघातस्त स्मात् । नहि नीलसुखादिपदार्थप्रपंचप्ररूपणया शून्यैकान्तः सत्ताधेकान्तो वा न विरुध्यते यतस्तया स्ववातो न स्यात् । ___ मराठी अर्थ:-हे अर प्रभो ! आपले अनेकांतात्मक मत खरे आहे. व इतरांनी कल्पिलेले एकांत मत असत्य. अनेकांत मत खरे कसे व एकांत मत खोटे का याचे वर्णन 'अन्वर्थसंज्ञः सुमतिर्मुनिस्त्वं ' या स्तोत्रामध्ये केले आहे. यास्तव एकांताच्या मते जे पदार्थस्वरूप वर्णिले जाईल ते सर्व असत्य आहे-अयोग्य आहे. एकांत दृष्टीने पदार्थस्वरूप वर्णिले जाणार नाही. जर एकांतदृष्टीने देखील पदार्थांचे वर्णन आह्मांस करतां येईल तर, शून्यैकांत, सत्ताद्वैत, वगैरेचा विरोध आह्मी कसा करूं शकू ? आमी या एकांत पदार्थाचा विरोध करतो- त्यांचे खंडन करू शकतो. यास्तव ते एकांतमत असत्य आहे. अं. तरंग पदार्थ आत्मा, ज्ञान, सुख वगैरे व बाह्य पदार्थ पुद्गलादि जड वस्तु या आपणास अनुभवास येतात. यांची आह्मी सिद्धि करूं शकतो. आमचे सर्व व्यवहार हे पदार्थ मानल्याने सुरलोत चालतात. यास्तव शून्यकांत मत असत्य आहे. तसेच सुखदुःख ज्ञान, शक्ति वगैरे गुण भिन्न भिन्न आत्म्यामध्ये दि. सतात. व जडपदार्थामध्येही तदनुरूप गुण दिसून येतात. ह्मणून ब्रह्मवादही खोटा आहे असें मणण्यास काय हरकत आहे. यावरून एकांतवाद खोटा आहे हे सिद्ध होते.
नन्वनेकांते विरोधादिदोषसम्भवात्कथमसौ युक्त इत्याशंक्याह--- अनेकांत मतांत विरोधादिक आठ दोष उत्पन्न होतात यामुळे
हे मत योग्य कसे मानावें या शंकेचे उत्तरये परस्खलितोनिद्राः
स्वदोषेभनिमीलिनः ।
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org