________________
( १८२ )
मीक्ष्यकारित्वं भक्त स्यादित्यत्राह नेत्यादि । मासमीक्ष्य न वस्तुस्वरूपं यथावदहावा | भवतः प्रवृत्तयः कायादिचेष्टा: हे धीर परीषहादिभ्यः परप्रश्नादिभ्यश्चाक्षुभितचित्त । तावकं त्वदीयं । अचिन्त्यमद्भुतमीहितं चेष्टितं । तीर्थकर नामकर्मोदयाद्भव्यप्राण्यदृष्टविशेष. वशाच सर्वमेतद्भवति इत्यर्थः ।
मराठी अर्थ :- हे मुनिश्रेष्ठा जिनदेवा ! आपल्या शरीराचे व्यापार, वाणीचे व्यापार व मनाचे व्यापार हे इच्छापूर्वक झाले नाहीत. वस्तूचें स्वरूप यथायोग्य न जाणतांच हे शारीरिक, वाचनिक व मानसिक व्यापार होत असतील असेही नाही. कारण, आपण पूर्ण जाणते आहांत. इच्छापूर्वक शरीरादिकांचे व्यापार होत नाहीत. अज्ञानपूर्वक शरीरादिकांचे व्यापार होणें आपल्या ठिकाणी अगदीच असंभवनीय. ही दोन्ही कारणे नसतांही जर शरीरादिकाचें व्यापार होतात तर हे जिनेश, आपला प्रभाव अचिंत्य आहे यांत कांही संशय नाहीं.
विशेष स्पष्टीकरणः श्री जिनाचा देशोदेशी विहार होणें, त्यांच्या मुखांतून दिव्य ध्वनि विवर्णे व त्यांचे मानसिक विचार चालणें ह्या क्रिया होण्यास विहायोगति व तीर्थकर कर्म कारण होत. विहायोगतिने त्यांचा सर्वत्र विहार होतो व तीर्थकर कर्मानें त्यांच्या मुखांतून उपदेश निघतो. तसेंच हे वर सांगितलेले व्यापार होण्यास भव्य जीवांचा पुण्य विशेष देखील कारण आहे. या दोन कारणांच्या साह्याने श्री जिनाचे हे सर्व शारीरिक, वाचिक व मानसिक व्यापार होतात; हैं सिद्ध होतें. केवलींच्या ठिकाणी मानसिक व्यापार कसे असतात. व ते कोणत्या कर्माच्या उदयाने होतात. केवलींना अतींद्रिय ज्ञान असतें, त्यांना इंद्रियजन्य ज्ञान होत नाहीं यामुळे त्यांचे मानसिक व्यापार कसे होतात अशीही शंका येते. या दोन
है
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org