________________
RANA
अ
MARATHIH."
समत
या।
अबाधित असे समंतभद्राचार्याचे युक्त्यनुशासनस्तोत्र सदी विजयी असो. - भाचार्याचा जिमशतक ' अथवा ' स्तुतिः विद्या या नावाचा एक ग्रंथ माहे. यात चौवीस तीर्थकरांची स्तुति आहे. हिंची रचना भाषायांनी शब्दालंकारामध्ये केली आहे. मुरजबंध, चक्रबंध, गतप्रन स्थागत, अर्धभ्रम, गोमूत्रिका इत्यादि बंधांचा आश्रय घेऊन ही स्तुति रचिली आहे. ही स्तुति समजण्याला अत्यंत कठिन पडले असते, जर हिच्यावर टीका कोणी लिहिली नसती. या स्तुति ग्रंथावर "नरसिंहम' या नांवाच्या विद्वानाने टीका लिहिली आहे. तो आपल्या टीकेच्या आरंभी असे ह्मणतो
समन्तभद्रं सद्धोध स्तुव वरगुणालयम् । निर्मलं यशःकांतं बभूव भुवनत्रयम् ॥ २॥ यस्य च सद्गुणाधारा कृतिरषा सुपमिनी । जिनशतकनामेति योगिनामपि दुष्करा ॥३॥' . तस्याः प्रबोधकः कश्चिन्नास्तीति विदुषां मतिः । यावत्तावद्धभूवैको नरसिंहो विभाकरः ॥ ४॥ दुर्गम दुर्गमं काव्यं श्रूयते महतां वचः।
नरसिंह पुनः प्राप्य सुगम संगमें भवेत् ॥५॥ अर्थ:----ज्यांचं यश सर्वत्र भरल्याने हे जग सुंदर व निर्मल वित लागले, त्या विद्वान, गुणपरिपूर्ण अशा समंतभद्राचायांची मी स्तुति करितो. आचार्य समंतभद्रांचे जिनशतक नावाचे सद्गुणांचा आधारभूत स्तोत्र आहे. ते सूर्यविकासी कमलाप्रमाणे आहे. ते स्तोत्र इतके कठिन आहे की तसलें स्तोत्र योगिजनांना देखील करितां येणार नाही. त्या स्तोत्राच्या अर्थाचा उलगडा करणारा जगांत कोणी. नाही अशी विद्वान लोकामध्ये प्रसिद्धि झाली होती. परंतु सूर्याप्रमाणे असलेल्या नरसिंहभट्टानें कमलाप्रमाणे असलेलें तें जिनशतक टीकारूपी किरणांनी विकसित केले आहे. जिनशतकग्रंथावरची टीकाः ।
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org