________________
(१८)
महाभाष्यस्याद। आप्तमीमांसा–प्रस्तावे असें धर्मभूषण आचार्यांची - झटलें नसतें.
"
बाबू जुगलकिशोर यांच्या अशा कल्पना आहेत कीं, समंतभद्राचार्यांच - गंधहस्त असें उपनाम असावें अथवा कर्मप्राभृतावर ४८००० हजार लोकांची जी त्यांनी टीका लिहिली असावी तिलाच गंधहस्ति महाभाष्य असें झणत असतील. किंवा आचार्यांचे शिष्य शिवकोटि नांवाचे होते त्यांनी तत्वावर टीका लिहिली आहे. तिलाच कदाचित् महाभाष्य आणत असावेत. परंतु ह्या सर्व कल्पना निर्मूल आहेत असें आह्मी दाखविलें आहे.
आचार्यांनी लिहिलेल्या देवागमस्तोत्राबद्दल वादिराज कवि आपल्या पार्श्वनाथ चरित काव्यांत असें झणतात --
स्वामिनश्चरितं तस्य कस्य नो विस्मयावहम् । देवागमेन सर्वज्ञो येनाद्यापि प्रदर्श्यते ॥ ७ ॥ अर्थः-- या कलिकालांतही ज्यांनीं देवागमस्तोत्राच्याद्वारे जगाला सर्वज्ञ दाखऊन दिला त्या स्वामी समंतभद्राचार्यांचें चरित्र कोणाला बरें भाश्वर्यंत पाडीत नाहीं ? या विवेचनानें देवागमस्तोत्राचे महत्व वाविकांच्या लक्षांत येईलच.
२ आचार्यांनी युक्त्यनुशासन हा एक ग्रंथ लिहिला आहे. हा हि स्तुतिरूपच आहे. या ग्रंथांत आचार्यांनी भगवान् महावीर तीर्थकरांची स्तुति केली आहे. यामध्ये ही अनेक अन्यमतांचे खंडन केलें आहे. या स्तोत्रावर विद्यानंदि आचार्यांनी फार सुंदर अशी टीका लिहिली आहे. टीकेचें ' युक्त्यनुशासनालंकार ' असें नांव आहे. विद्यानंद आचार्यांनी युक्त्यनुशासनाची पुढें दिहिल्याप्रमाणे प्रशंसा केली आहे -- प्रमाणनयनिर्णीतवस्तुतत्वमवाधितम् ।
Jain Educationa International
जीयात्समन्तभद्रस्य स्तोत्रं युक्त्यनुशासनम् ॥
- प्रमाण में लय यांच्याद्वारे वस्तुंच्या स्वरूपाचा निर्णय करणारे
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org