________________
( १५७ )
केवलमप्यलं ते अभ्यंतरं शुभाशुभजीव परिणामलक्षणं कारणं केवळं बाह्यवस्तु निरपेक्षं ।
मराठी अर्थ :- पुष्प, गंध इत्यादिक वाह्य पदार्थ पूजेची सामग्री हे पुण्य किंवा पाप उत्पन्न होण्यास निमित्तकारण, आहेत व हे पदार्थ आत्म्यामध्ये उत्पन्न होणान्या शुभ किंव अशुभ परिणामास सहकारी कारण आहेत. आत्मा हा शुभा शुभ परिणाम उत्पन्न होण्याला मुख्य कारण - उपादानकारण आहे त्यास अंतरंगकारण ह्मणतात. व पुष्पादिक पदार्थ बहिरंगकारण - सहकारिकारण आहेत. यातच निमित्तकारण असें ही म्हणतात. ज्याच्या अंतःकरगामध्ये भक्ति नाहीं अशा तपहेच्या शुभ परिणामहीन मनुष्यास पूजादिक बाह्य कारणें पुण्योत्पत्तीला कारण होऊ शकत नाहीत. परंतु ज्याच्या अंतःकरणामध्ये स्वभावतःच भक्ति उत्पन्न होतें, त्याला बाह्य गंध, पुष्पें इत्यादि पूजा साहित्याची अपेक्षा लागत नाहीं. परंतु सर्व मनुष्यांच्या अंतःकरणामध्यें भक्तिरसाचा प्रवाह आपोआपच वाहू लागत नाहीं, यास्तव त्यांना बाह्य पूजा द्रव्यांची आवश्यकता असते. श्री जिनेश्वराच्या गुणांच्या ठिकाणीं ज्यांचा तत्काल लय लागतो, अशा मुनींना या बाह्य वस्तूंची आवश्यकता भासत नाहीं. यावरून सर्वथा बाह्य पदार्थांची आवश्यकता नकोच असें ह्मणर्णे योग्य ठरत नाहीं.
भावार्थ:- बाह्य इंद्रियांचे विषय असतात ते पूजनाच्या वेळेसही जर जवळ असले तरच गृहस्थाचे मन पूजा अथवा भक्तिमध्यें लागू शकते. इतरथा मन स्थिर राहत नाहीं. पूजेचे निरालंब स्वरूपापासून ते लांब कोणते तरी भोग्यविषयाकडे पळत असते.
एतच्च ववं जैनमत
Jain Educationa International
एव
घटते नान्यत्रेति दर्शयन्नाह ।
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org