________________
(१५०) मोहेन समन्वितो रिपुः मोहरिपुस्तं, निरस्य निराकृत्य। इत्ययं स्वार्थसम्पत्तोरुपायः । असि स्म कैवल्यविभूतिसम्राडिति स्वार्थसम्पत्तिः । असि स्म भूतवान् । केवलं असहायं क्षायिक ज्ञानं केवलमेव कैवल्यं तस्मिसति विभूतिः समवसरणादिलक्ष्मीस्तस्याः सम्राट चक्रवर्ती । यत एवं ततः कारणात्। त्वमर्हन् असि भवसि मे मम स्तवार्हः स्तुतियोग्यः।।
मराठी अर्थ:-सर्व वस्तु सद्रूपच आहेत, सर्व वस्तु असद्रूपच आहेत किंवा सर्व वस्तु नित्यच आहेत; अशा एकांत वाचे खंडन, अनेकान्तसमर्थक आगम, प्रत्यक्ष व अनुमान इत्यादि प्रमाणरूपी बाणांनी होते. आगमामध्ये ' सर्वमनेकान्तात्मक वस्तु एकांतस्वरूपानुपलब्धेः '-वस्तुमध्ये अनेक धर्म आहेत. कारण, ती एका धर्माला धारण करते असे आढळून येत नाही ह्मणून हैं अनुमान अनेकान्तात्मक वस्तूची सिद्धि करते. तसेच एकान्त वादाचा निषेध करणारे हे अनुमान आहे. 'नास्ति सर्वथैकांतः सर्वदानेकांतोपलब्धेः, सर्वथा एकांत वाद नाहींहमेशा अनेकांत वादच सर्वत्र दिसून येतो' येथे असा प्रश्न उत्पन्न होतों की एकांतवादाची उपलब्धि होते किंवा नाही ? जर तो आढळून येत असेल तर त्याचे खंडन होणे शक्यच नाही ? आणि एकांतवाद जर जगांत नसेल तर अनेकांतांशी तो विरोध तरी कसा करील? कारण, एकांतवादाचें अस्तित्व असेल तरच तो विरोध करूं शकला असतां ? यास्तव एकांतवादाचा निषेध आपण करू शकत नाही. असें मणणे देखील योग्य नाही.
जरी वस्तु अनेकधर्मामक आहे तथापि ती एकधर्मात्मकच आहे असा तिच्यावर मिथ्यादृष्टी आरोप करतात. ह्मणून त्या एकांत वादाचा आह्मी निषेध करू शकतो. जर असा निषेध आही करणार नाही तर एकान्तात्मकच वस्तूचे स्वरूप आहे
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org