________________
(१४६ ) त्यादि । मावाभावरूपं द्रव्यपर्यायरूपं वा द्वयमवधिर्मर्यादा सर्वार्थानां, त. स्मात्तदा धर्मद्वयमाश्रित्य कार्यकरं हि स्फुटं वस्तु घटादि ।
अर्थः-वक्ता ज्या धर्माचे वर्णन करण्याची इच्छा करतो तो धर्म वक्त्याकडून मुख्य मानला जातो. व वक्त्याला इष्ट नसलेला धर्म गौण होतो. तसेच वस्तूमध्ये अनेक धर्म असतात ह्मणूनच वक्ता एकास मुख्यता व अन्य धर्मास गौण करीत अ. सतो. वस्तूमध्ये अनेक धर्म कसे असतात हे सिद्ध करण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. देवदत्त हा एका मनुष्याचा शत्रु आहे. कारण, तो त्यास हमेशा त्रास देत असतो. तसेच देवदत्त हा एका मनुष्याचा मित्र आहे. कारण, तो त्याच्यावर उपकार करीत असतो. तोच देवदत्त एका मनुष्याचा मित्र व शत्रु देखील आहे. व एका मनुष्याचा तो मित्रही नाही व शत्रुही नाही. तो त्या मनुष्याविषयीं हमेशा उदासीन असतो. आतां या उदारहणांतील देवदत्तामध्ये जसे आपणांस अनेक स्वभाव दृष्टीस पडले, तद्वत्च वस्तूमध्येही अनेक धर्म असतात. वस्तु भावाभावरूप असते, द्रव्यपर्यायरूप असते. ह्या दोन धर्माच्या योगे वस्तु कार्य करण्यास समर्थ होते. केवळ द्रव्य, पर्याय रहित कोणतें ही कार्य करूं शकत नाही, व केवळ प
यदेखील कोणतेही कार्य करू शकत नाहीत. कारण, केवळ द्रव्य मंणजे वस्तु नव्हे किंवा केवळ पर्याय झणजेही वस्तु नव्हे. द्रव्य व पर्याय ही दोन अंगें वस्तुची आहेत. या दोन अंगांनी वस्तु बनलेली आहे. व या दोन अंगांनी युक्त असल्यामुळेच वस्तूला. वस्तुपणा आला आहे. वस्तु भावाभावस्व.. रुपी आहे. हे श्रेयांसनाथ जिनेश आपल्या मतामध्ये निःस्वभावी वस्तूच नाही. भाव व अभाव यांचे वर्णन मागे केले आहे.
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org