________________
(१४४ ) मुळे एकटा पदार्थ त्या सर्व गुणाला कसा आधार देऊ शकेल ? प्रत्येक गुणांची परिणति भिन्न भिन्न होत असल्यामुळे त्या आधारामध्ये त्या वस्तूमध्ये वैचित्र्य उत्पन्न झालेले असते हे वैचित्र्य एक नसते.कारणं वैचित्र्य व एक हे शब्द परस्पर विरुद्ध नाहीत काय ? यास्तव अर्थानें देखील अभेद वृत्ति संभवत नाही.
४ संबंधाने देखील अभेदवृत्ति संभवत नाही कारण संबंधी अनेक असल्यामुळे संबंधाचे देखील अनेक भेद होतात. जसे काठी व देवदत्त यांच्या संबंधाहून छत्र व देवदत्त यांचा संबंध वेगळा आहे. आपल्या शरीराचा हाताशी जो संबंध आहे तो पायाचा शरीराशी जो संबंध आहे त्याहून भिन्न आहे यावरून जितके संबंधी असतात, तेवढे संबं. धाचे भेद होतात हे सिद्ध होतें.
५ अनेक गुणांनी वस्तूबर केलेला उपकारं एकचें असतं नाही. कारण प्रत्यक गुण वस्तूवर भिन्न भिन्न उपकार करीत असतो. उपकार करणारे अनेक असल्यामुळे उपकार एक कसा अभू शंकेले ?
. ६ गुणिदेशानेही अभेदवृत्ति सिद्ध होते माही. गुणिदेशामध्ये देखील प्रत्येक गुणामुळे भेद मानला पाहिजे. गुणिदेशामध्ये तथापि अ. भेद मानला तर भिन्न पदार्थांतील गुणांच्या योगें देखी गुणिदेशामध्ये भेद होणार नाही. इतरं गुणांनी देखील गुणिदेशामध्ये अभिन्नता दिसू लागेल हा दोष उत्पन्न होईल. ___७ संसर्गामध्येही अनेक संसर्गीच्या भेदानें भेद मानला पाहिजे. संसर्गामध्ये भेद न मानल्यास संसर्गिमध्ये अनेकपणा येणार नाही.
८ शब्दाने देखील अभेद वृत्ति सिद्ध होत नाही. पदार्थ भिन्न भिन्न असल्यामुळे शब्द देखील भिन्न भिन्न मानले पाहिजेत. पदार्थात जितके गुण आहेत ते सर्व एका शब्दाने सांगितले जात नाही. जर सर्व गुणांचा प्रतिपादक एकच शब्द मानला तर संपूर्ण पदार्थ एकाच शब्दानें वर्णिले गेल्यामुळे जगांतून इतर शब्दांचा व्यवहार बिलकुल नाहीसा होईल.
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org