________________
( १४३ )
आतां याच वर वर्णिलेल्या आठ प्रकारांनी वस्तूतील भिन्न भिन्न गुणामध्ये अभेदोपचार कसा करता येतो याचे वर्णन खाली लिहिल्या. प्रमाणे समजावें-- .: द्रव्यार्थिक नयाला गौण करून आपण पर्यायार्थिक नयास प्रधान ता देतो त्यावेळेस ही अमेदवृत्ति गुणामध्ये संभवत नाही. .. १ प्रथमतः कालाने अभेदवृत्ति गुणाची होत नाही हे पाहूं वस्तू. मध्ये एकेकाली परस्पर विरुद्ध नाना गुण राहू शकत नाहीत. कारण प्रतिक्षणी वस्तूमध्ये फरक होत असतो. जर परस्पर विरुद्ध गुण देखील एकेकाली वस्तुमध्ये राहू लागले तर गुण अनेक असल्यामुळे जसा त्यांच्यात परस्पर भेद आहे तसाच त्या गुणांस आश्रय देणान्यावस्तूचे देखील तेवढेच भेद-प्रकार होतील. येथें गुणाचा आश्रय असणाऱ्या वस्तूचे अनेक भेद कसे होतात असा प्रश्न उपस्थित होईल. परंतु याचे उत्तर असे आहे की या ठिकाणी पर्यायनयासच प्राधान्य दिले आहे व गुणांस पर्याय असेंही नाव आहे. कारण द्रव्यार्थिक पर्यायार्थिक असें नयाचे दोनच भेद केले आहेत, तिसरा गुणार्थिक नय पूर्वाचार्यांनी मानला नाही. यावरून गुणांस पर्याय असेंही ह्मणावयास काही हरकत नाही. ब गुणांसच मुख्यता दि. त्याने त्यांचा आधार ह्मणून द्रव्य आपणांस दिसत नाही व आधार मानल्यास गुणाएवढेच त्या आधाराचे देखील भेद होतील. यास्तव का. लाच्या आश्रयाने नानागुणामध्ये अभेदवृत्ति होऊ शकत नाही.
. २ आता आत्मरूपाने ही अभेदवृत्ति होत नाही. प्रत्येक गुणाचें स्वरूप वेगळे आहे जे स्वरूप एका गुणाचे आहे तेंच स्वरूप दुसऱ्या गुणाचे नसते. सर्व गुणाच्या स्वरूपामध्ये फरक नसतां तर गुणामध्ये नानापणा-भिन्नपणा दिसून आला असता काय ?
३ गुणांस आधारभूत पदार्थाचे देखील भिन्नत्व, व त्याचे अनेकत्व मानले पाहिजे. कारण नाना गुणांचा आधार तो आधार असल्या
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org