________________
( १४२ )
"
दाभेद असे नांव आहे. कथंचित्तादात्म्य हें वस्तूचे स्वरूप आहे. तादात्म्य या शब्दाचा अर्थ असा करतात - तत् या शब्दाचा अर्थ वस्तु ' असा होतो. व आत्मा ह्मणजे वस्तूचा स्वभाव, अर्थात् वस्तु भेदाभेदात्मक आहे असें ' तादात्म्य' हा शब्द आह्मांस सांगत असतो या तादाम्याच्यामागे कथंचित् हा शब्द योजण्याचें कारण हें आहे कीं सर्वथा भेद किंवा सर्वथा अभेद हा परस्पर निरपेक्ष असतो त्यामुळे वस्तूंची सिद्धि होत नाहीं. मेद हा अमेदाची अपेक्षा करतो व अभेद हा भेदाची अपेक्षा करतो. हे हमेशा सापेक्ष असतात. केव्हांही अभेद आपणास भेदविरहित भेदाची परवा न करणारा असा आढळून येणार नाहीं. तसेच भेद देखील अभेदाशिबाय आढळणार नाहीं. यावरून सर्वथा भेद किंवा अनेद मानल्यानें बस्तु सेद्रि होत नाहीं हें सिद्ध होतें कथंचितादात्म्य किंवा कथंचिदाभेद हे वस्तूचे रूप आहे, यावरून कथंचितादात्म्याचे स्वरूप ध्यानांत येतें. कथंचित्तादात्म्य संबंधामध्यें अमेद मुख्य असतो व भेद गौण असतो. संसर्गसंबंधामध्ये भेद मुख्य अपतो व अभेद गौण असतो. हा दोहोंत फरक आहे. कथंचित्तादात्म्य हगने कथंचिद्भेदाभेद असणे. अभेदास मुख्य मानून भेदाची गौणता जेथें असतें व्यास संबंध ह्मणतात. व जेथें भेद मुख्य असून अमेदास गौणता असते त्यास संसर्ग झणतात.
८ जो अस्ति असा शब्द अस्तित्व धर्माला धारण करणाऱ्या वस्तूचा वाचक आहे तोच अस्ति हा शब्द अनंत धर्माला धारण करणाऱ्या वस्तूचा देखील वाचक आहे. एक शब्दानें संपूर्ण धर्मांचे वर्णन करतां येते ह्मणून शब्दानें देखील अमेदवृत्ति कशी दाखवितां येतें हैं सिद्ध झाले. पर्यायार्थिक नयास गौण करून व द्रव्यार्थिक नयाला मुख्यता देऊन वर वर्णिलेल्या आठ प्रकारांनी अभेदवृत्तीचें वर्णन करता
येते.
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org