________________
( १३९ ) धर्मात्मक वस्तूचे वर्णन शब्दद्वारे होऊ शकते. पर्यायदृष्टीने पाहिल्यास वस्तूंतील सगळे गुण परस्परापासून भिन्न आहेत तथापि त्यांच्यामध्ये एकत्वाचा आरोप करून अभेदोपचाराने आपल्यास शब्दद्वारे वस्तूचे सं पूर्ण स्वरूप वर्णन करता येते. द्रव्यार्थिकनयाने अनंत पर्यायांना धारण करणारे द्रव्य हे एकच आहे असे वर्णन करणारे प्रमाणवाक्य एकच द्रव्यपदार्थास त्याने विषय केल्यामुळे अनेक अर्थाचें तें वाचक होऊ शकत नाही. पर्यायनयाच्या अपेक्षेने संपूर्ण पर्याय भिन्न अमताही त्यांच्यात अभेदकल्पना केल्याने एकत्र आले. यामुळे, एकच वस्तु पर्यायार्थिक नयाच्या दृष्टीने देखील प्रमाणवाक्याचा विषय झाली. यावरून शब्द जसें अनेक अर्थाचे वाचक प्रधानपणे नसतात तसेंच वाक्य देखोल मुख्यत्वे करून अनेक अर्थाचे वाचक होत नाही हे सिद्ध झाले. व प्रमाण वाक्याने प्रमाण ज्ञान होते हेही सिद्ध झाले.
वर प्रमाणाचे लक्षण सांगितलें आहे. त्यात अभेदोपचार व अभेद. वृत्ति यांच्या आश्रयाने शब्द वस्तूचे सर्व स्वरूप वर्णन करतो असें हटले आहे. परंतु ही अमेदकल्पना ज्याच्या आश्रयाने होते त्यांचे थोडक्यांत स्वरूप वर्णन केल्याने प्रमाणाचे स्वरूप चांगले लक्षात येईल.
काल, आत्मरूप, अर्थ, संबंध, उपकार, गुणिदेश, संसर्ग, व शन्द यांच्या योगें प्रमाणाचे स्वरूप ध्यानात येतें तें असें
कथंचित् जीवादि वस्तु आहेतच. या वाक्यांत, ज्यावेळेस अस्तिव धर्म जीवादि पदार्थामधे आहे त्याचवेळेस बाकीचे अनंत धर्म देखील त्या जीवादि पदार्थात आहेत, ह्मणून एका कालाच्या आश्रयाने त्या अनंत धर्माची अभिन्नता आहे ही कालाच्या आश्रयाने अभिन्नता झाली. २ अस्तित्व गुण जसा जीवाचे आत्मस्वरूप आहे तसेच अन्य अनंत गुण देखील जीवाचेंच स्वरूप आहे. तेव्हां या आत्मस्वरूपाच्या दृष्टीने सर्व गुणामध्ये अभेद सिद्ध होतो ३ जीवद्रव्यरूप अर्थ जसा अस्तित्व
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org