________________
(१३८ ) अनेक नसतो असें झटले आहे. यामुळे येथे संशय व विरोधही उत्पन्न होतो. यास्तव शब्दांचा एकच वाच्यार्थ मानूं नये असे शंकाकार ह्मणतो. स्यास आपण असे विचारू या. ' शब्दाचे एक व अनेक वाच्यार्थ असतात असे जे आपले झणणे आहे ' त्यांत शब्दांचे एक व अनेक वाच्यार्थ एकदम प्रधानपणाने असतात किंवा गौण व मुख्यपणानें अस तात.? मुख्यपणानेच शब्दांचे एक व अनेक वाच्यार्थ असतात हे ह्मणणे अयोग्य आहे. कारण, तशी प्रतीति-तसा अनुभव बिलकुल येत नाही. वृक्ष हा शब्द प्रथमतः वृक्षत्व जातीच्या द्वारे वृक्षपदार्थाचा वाचक आहे तदनन्तर तो लिङ्ग व संख्या यांचा बोधक आहे. यावरून प्रधानपणाने वृक्षपदार्थाचा वाचक वृक्ष हा शब्द आहे. व बहुत्व संख्येचा बोध गौण रीतीने होतो. संपूर्ण शब्दांचा मुख्य गौण अर्थ अवश्य असतो. व पदार्थामध्येही क्क्यच्या इच्छेला अनुसरून गौणप्रधानभाव होत असलेला आपल्या दृष्टीस प्रत्यहीं पडत असतो.
. शब्दामध्ये प्रधान रीतीनें व गौणपणाने वाच्यार्थाचा बोध करण्याचा स्वभाव आफ्ण मानला हे एवढ्या विवेचनावरून ठरतें. परन्तु या शब्दांच्या योगें संपूर्णपणे वस्तूंतील सर्व धर्माचे ज्ञान मुख्यपणे होणार नाही, गौणपणे क मुख्यपणानेच सर्व धर्मात्मक वस्तूस ते शब्द चोतित करतील. यामुळे शब्दानें प्रमाणात्मक ज्ञान अ ह्मास केव्हांच होणार नाही. हमेशः नयात्मकच झान होईल. प्रमाणज्ञान होण्यास मार्गच उरला नाही. असे कित्येक ह्मणतील, परन्तु त्यांचे ह्मणणें कसं अयोग्य आहे व प्रमाणज्ञान कसे होते याचे स्वरूप याप्रमाणे समजाकें..
“ एकगुणमुखेनाशेषवस्तुरूपसंग्रहात्सकलादेशः' पदार्था- . तील एका कोणत्या तरी गुणाला मुख्य समजून त्याचे द्वारे संपूर्ण वस्तुधर्माचा संग्रह करणे यास सकलादेश पणतात क ा सकलादेश प्रमामाज्ञानाच्या अधीन आहे. द्रव्यार्थिक दृष्टीने गुण हे गुणिपासून-द्रव्यापासून अभिना आहेत. यास्तव अभेद समजून एक गुणाच्याद्वारे संपूर्ण
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org