SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 179
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ (१३७) यावरून शेब्दाचे अनेक अर्थ होत नसतात हे सिद्ध झाले. जर शब्दाचे अनेक अर्थ झाले असते तर भिन्न भिन्न पदार्थास ओळखण्यास भिन्न भिन्न शब्दांचा व्यवहार करण्यास आमांस जरूर पडली नसती. एका शब्दाने जगांतील सर्व पदार्थांचे स्वरूप लक्ष्यात आले असते. शब्दामध्ये भिन्नता असल्यामुळे अर्थामध्ये भिन्नता मानली पाहिजे. जसे एका इंद्राला शक्र, पुरंदर अशा भिन्न शब्दांने आपण जाणतो त्या अर्थी शक शब्दाचा वाच्यार्थ दुसराच आहे; व पुरंदर शब्दाचाही वाच्यार्थ दुसराच आहे. इंद्राच्या भिन्नभिन्न शक्तींचे वाचक हे शब्द आहेत. तसेंच अर्थभिन्नता दिसून आल्यामुळे शब्दभिन्नता देखील जरूर मानली पाहिजे. अन्यथा वाच्यवाचकनियमाचा लोप होण्याचा प्रसंग येईल. शब्दांचे अनेक अर्थ नसल्यामुळे शब्द समूहापासून बनलेल्या वाक्याचेही अनेक अर्थ होत नाहीत. एवढ्या विवेचनावरून शब्दामध्ये एकावेळेस एकाच पदार्थाचे प्रतिपादन करण्याची शक्ति आहे अनेक पदार्थांचे वर्णन करण्याची शक्ति नाही हे सिद्ध होते. सेना, वन, गांव इत्यादि शब्दांचे देखील अनेक अर्थ होत नाही. हत्ती घोडा, रथ पायदळ यांचा जो एक समूह यासच सेना असें झणतात. वन मणजे नानात हेच्या झाडांचा जो एक समूह यासच वन ह्मणतात. पुष्कळ घरांचा जो एक समूह थासच गांव असें ह्मणतात. याचप्रमाणे पंक्ति माला कळप इत्यादि शब्दांचे अनेक. अनेक अर्थ नाही हे सिद्ध होते. (१) टीप:-(१) 'अनेकमेकंच पदस्य वाच्यं वृक्षा इति प्रत्ययवत्प्रकृत्याः" या श्लोकाच्या दोन चरणामध्ये शब्दाचे एक व अनेक देखील वाच्य असतात असे याच ग्रन्थकाराने पुष्पदन्त जिनाच्या म्ला त्रांमध्ये झटले. आहे. वर तर प्रत्येक शब्दांचा बाच्य एकच असतो Jain Educationa International For Personal and Private Use Only www.jainelibrary.org
SR No.003839
Book TitleSwayambhu Stotra Chaturvinshati Jinstuti
Original Sutra AuthorN/A
AuthorSamantbhadracharya, Prabhachandracharya, Jindas Parshwanath Phadkule
PublisherSakharam Nemchand Doshi
Publication Year
Total Pages314
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size14 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy