________________
प्रमाणापासून नय कथंचित् भिन्न असल्यामुळे त्यास आपण कथंचित् अप्रमाण झणूं शकू व कथंचित् अभिन्न असल्यामुळे त्यास प्रमाणही मगं शकू. परन्तु त्यांस सर्वया प्रमाण किंवा सर्वथा अप्रमाण ह्मणता येत नाही. येथेही समुद्रैकदेशाचे उदाहरण लागू पडते.
आता आपण प्रमाणज्ञानाविषयी थोडासा विचार करू. प्रमाणज्ञानामध्ये वस्तूचे सर्व स्वरूप जाणण्याची शाक्त आहे. परन्तु प्रमाणात्मक किंवा नयात्मक ज्ञान उत्पन्न होण्यास शब्दच साधन आहे. कारण शब्दामध्ये पदार्थाचा स्वरूपाचें मान करून देण्याची शक्ति आहे. परन्तु शब्दामध्ये पदार्थाचें सर्व स्वरूप वर्णन करण्याची शक्ति नाही. एक शब्द एकाच पदार्थाचा वाचक असतो. एकाशदाचे अनेक वाच्य नसतात. सत् हा शन्द सत्पदार्थाचा वाचक आहे. असत्पदार्थ त्याचा विषय होणार नाही. असत् हा शब्द सत्पदार्थाचा वाचक होत नाही. जर सत् हा शब्द असत् पदार्थाचा वाचक व असत् हा शन्द सत्पदार्थाचा वाचक मानला जाईल तर प्रत्येक शब्दाचे नियत वाच्य होणार नाहीत कोणत्याही शब्दाने कोणत्याही पदार्थाचा बोध होऊ लागेल व संशय उत्पन्न होऊन घोटाळा माजेल. कित्येक शब्दांचे पुष्कळ अथे असतात. जसे गो या शम्दाचे दिशा वाणी, पृथ्वी, गाय वगैरे. तेव्हां एका शब्दाचा एकच अर्थ असतो हे कसे ? असा मनामध्ये संशय उत्पन्न होतो. परन्तु वास्तविक कोणत्याच शब्दाचे अनेक अर्थ नसतात. गो या शब्दाचे देखील अनेक अर्थ नाहीत. ज्या गो शब्दाचा अर्थ दिशा असा होतो व ज्या गो शब्दाचा अर्थ वाणी, पृथ्वी, गाय असा होतो ते सर्व गोशब्द निरनिराळेच आहेत. आपणांस सादृश्यामुळे एकाच गोशब्दाचे हे सर्व अर्थ आहेत असे वाटते.
Jain Educationa international
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org