________________
( १३५)
पदार्थांना हीनाधिक रीतीने जाणण्याच्या शक्तिमुळेंच नय व प्रमाण असे भेद झाले आहेत. नय ज्ञानामध्ये कमी विशुद्धि असते ह्मणून पदार्थाच्या सर्व अंशांना ते जाणीत नाहीं. परंतु प्रमाण ज्ञानामध्ये विशुद्धि जास्ती असते यामुळे तें ज्ञान पदार्थाच्या सर्व अंशांना जाणते. २ नय ज्ञानाने जाणलेला जो पदार्थोंचा अंश त्यास वस्तुही ह्मणता येत नाहीं व अवस्तुही लगता येत नाहीं परंतु त्यास वस्त्वंश असें आपण ह्मणू शकतो. जसे समुद्राच्या एका दिवाला समुद्र होगतां येत नाहीं. जर त्यास आपण समुद्र ह्मणं तर जितके समुद्राचे हिस्से होतील त्या स
स समुद्र ह्मणावे लागेल. व अशा रीतीनें पुष्कळ समुद्र होती - ल. व तेवढ्याच भागाला समुद्र झटलें तर बाकीच्या सर्व भा गांना समुद्र म्हणावें लागेल. यास्तव समुद्राचा एक भाग समुद्री नाहीं व असमुद्रही नाहीं परंतु तो समुद्राचा अंश आहे. असे आपण म्हणू शकतो.
प्रमाणाहून नय भिन्न असल्यामुळे त्यास अप्रमाण वटल्यास काय हरकत आहे ? असें झणणे ही योग्य नाहीं. तसे मानल्यास मिथ्या ज्ञानास जसे अप्रमाण आपण ह्मणतो व त्यामुळे त्यास खरेपणा असतं नाहीं. याचप्रमाणे नयज्ञानासही खरेपणा येणार नाहीं. परन्तु नयज्ञान हें खरें आहे. नयज्ञान हैं प्रमाणही नाहीं व अप्रमाणही नाहीं. परन्तु प्रमाणखानाचा एक हिस्सा आहे. येथेही समुद्रांशाचे उदाहरण योजिलें ह्मणजे नयाचे स्वरूप चांगलें ध्यानांत येतें. तें नयज्ञान प्रमाणज्ञानाचा एकदेश आहे असें सांगितलें, परन्तु तो एकदेश प्रमाणज्ञानापासून सर्वथा भिन्न मानला असतां तर त्यास अप्रमाणता आली असती. किंवा प्रमाणज्ञानापासून त्यास सर्वथा अभिन्न मानलें असतें तर त्यास प्रमाण मानावें लागलें असते.
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org