________________
( १२८ ) भावार्थः-मीमांसकांनी, यज्ञ केल्याने सर्व तन्हेचे ऐश्वर्य मिळते, असा उपदेश केला आहे..
यज्ञार्थं पशवः सृष्टाः स्वयमेव स्वयम्भुवा । यज्ञो हि भूत्यै सर्वे । तस्माद्यज्ञे वधोऽवधः ।। असेंही त्यांनी मटले आहे. ब्रह्मदेवाने, मनुष्यांनी यज्ञ करावा ह्मणून, स्वतः पशु उत्पन्न केले आहेत. यज्ञ केल्याने मनुध्याचे कल्याण होते. यास्तव यशामध्ये पशूना मारले असतां त्यापासून हिंसा होत नाही. परंतु हे त्यांचे मगणे योग्य नाही. हिंसेपासून केव्हाही धर्म साधन होत नाही. हिंसा करण्याने जर धर्मसाधन होईल तर पारधी मासे पकडणारे, व शिकार करणाऱ्या लोकांना धर्म साधन चांगल्या प्रकार घडत असेल. व 'अहिंसा लक्षणोधर्मः' 'दया प्राण्यनु कम्पनम् ' इत्यादि वचनें असत्य समजावी लागतील. . आतां यक्षामध्ये पशु हिंसा केल्यास तिच्यापासून पातक लागत नाही परंतु ती अन्य ठिकाणी केली मगजे पातक लागतें व यज्ञामध्ये केली असतां पुण्य मिळतें असेंही झणणे योग्य • नाही. तुझी कोठेही पशु वध करा त्यापासून पातक हे लागणारच. जर यज्ञाकरितांच पशूना विधात्याने निर्माण केले आहे तर ते विकत घेणे किंवा विकणे यापासून पातक लागेल. जसे लेप करण्यासाठी जे औषध दिले आहे ते आपण खाल्ले असतां भलताच परिणाम घडतो. यासाठी ज्या वस्तूचा ज्या कार्यात उपयोग करावयाचा आहे. तेथे तिचा उपयोग न करता अन्यत्र केल्यास ते दोषावह होते. यासाठी पशु विक्रय करणे पापास कारण होईल..... .. .. .. आतां जसें विष मंत्रसंस्काराने निर्विष केल्यास त्यापासून अपाय घडत नाही तसेंच मंत्रसंस्कारपूर्वक पशुवध केल्यास
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org