________________
( १२६ ) जागरितवानेव । मष्टनिद्र एव । क ! आत्मविशुद्धवर्मनि आत्मा विशेषेण शुद्धो निखिलकर्मरहितो यस्माद्भवति तदात्मविशुद्ध । आत्मन्येव सम्बन्धि विशुद्ध आवरणमोह विगभेन शुद्धं । तच्च तद्वम॑ च सम्यग्दर्शन दिलक्षणो मोक्षमार्गस्तस्मिन् ।
मराठी अर्थ:-सर्व लोक आपण पुष्कळ वर्षे वाचावे या इच्छेने व इंद्रियांना मोहित करणाऱ्या कामसुखाच्या इच्छेनें पीडित होऊन, नौकरी, व्यापार इत्यादिक कामे करतात. व या सर्व दिवस कृत्यांनी ते थकून जाऊन रात्री श्रमपरिहार कर ण्यासाठी झोप घेतात. परंतु हे पूज्य शीतल भगवान् , आपण प्रमादरहित होऊन निद्रेचा पराजय केला, व घातिकर्माचा नाश करून शुद्ध आत्मतत्वाची प्राप्ति करून देणाऱ्या रत्नत्रयरूपी मोक्षमार्गामध्ये रात्रंदिवस जागृत राहिलात.
तात्पर्य:-इतर जनामध्ये व शीतल तीर्थकरामध्ये जमीन अस्मानाचे अंतर आहे. इतर जन जीवनकलह निर्विघ्न पार पडावा ह्मणून, व विषय सुखांची प्राप्ति व्हावी झणून नाना तम्हेचे व्यवसाय करतात. याप्रमाणे ही दिवसकृत्ये करून आलेल्या थकव्याचा परिहार करण्यासाठी रात्री झोप घेतात. यामुळे रत्नत्रयाची आराधना करण्यास त्यांना फुरसतच मिळत माही. अर्थपुरुषार्थ व काम पुरुषार्थ या दोन पुरुषार्थाची प्राप्ति करून घेण्यांत त्यांचा सर्वकाल निघून जातो. धर्म पुरुषार्थाचे साधन त्यांच्या हातून होत नाही. परंतु शीतल जिनांनी रात्रं दिवस रत्नत्रयाराधन केले, निद्रेचा पराजय त्यांनी केला.घातिकर्माचा नाश करून शुद्ध आत्मतत्वाची प्राप्ति करून घेतली. हा प्राकृत जनांत व शीतलनाथ यांच्यामध्ये फरक आहे.
__ तथा तृष्णाभिभूताः प्राणिनान्यदपि कुर्वन्तीत्याह --- तसेंच विषयतृष्णेला बळी पडलेले संसारी जीव आण
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org