________________
(१२३ ) संसारताप नाहीसा करून जीवांना कायमचे सुखी करण्याचे सामर्थ्य जिनेश्वराच्या उपदेशाशिवाय इतर ठिकाणी आढळून येणार नाही. जरी जगांत पुष्कळसे पदार्थ सन्ताप मिटविणारे आहेत; तथापि त्यांच्या अंगी संसारदुःख दूर करण्याची शक्ति बिलकुल नाही. चन्दनाच्या लेयाने किंवा चन्द्रकिरणांनी, आपल्या अंगी वाढलेला दाह नाहीसा होईल. परन्तु संसारदुःखाचा नाश करण्यास उपरोक्त पदार्थ समर्थ होतील काय? यास्तव संसारदुःखाचा नाश करण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन भव्य विद्वज्जन, हे शीतल जिनेश, आपल्या शीतल वचनकिरणांचा आश्रय करतात.
यस्य भगवत ईदृशा वाक्यरश्मयः स किं कृतवानित्याह ।
ज्या जिनेश्वराचे वचनकिरण असे अद्भत सामर्थ्य ठेवतात त्या भगवन्तानें कोणी कृत्ये केली याचे स्तुतिकार वर्णन करतात.
सुखाभिलाषानलदाहमूछितं,
मनो निजं ज्ञानमयामृताम्बुभिः । व्यदिध्यपस्त्वं विषदाहमोहित,
यथा भिषग्मन्त्रगुणैः स्वविग्रहम् ॥४७॥ सुखाभिलाषेत्यादि । व्यदिध्यपस्त्वं विध्यापितवान् भवान् । किं तत् ? मनः । कथम्भूतमित्याह-सुखेत्यादि । इन्द्रादिसुख ममास्त्विति वाञ्छा सुखाभिलाषः । स एवानलः सन्तापहेतुत्वात्तेन दाहश्चातुर्गतिकं दुःखं सन्तापश्च, तेन मूर्छितं मोहितं हेयोपादेयवित्रेकविमुखीकृत मन आत्मस्वरूपं । निजमात्मीयं । कैस्तद्व्यदिध्यप इत्याह-ज्ञानेत्यादि । ज्ञानेन निवृत्तानि ज्ञानमयानि ज्ञानस्वभावानि । ज्ञानमित्युपलक्षणं दर्शनचारित्रयोः । तानि च तान्यमतानि च तान्येवाम्बूनि तैः । कैरिव कः कमित्याह-विषेत्यादि । विषेण दाहः सन्तापस्तेन मोहितं मूर्छितं । स्वकि
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org