________________
( १२१ ) चरणकमलांना भक्तीने नमस्कार करतो.
नवव्या तीर्थकरांना पुष्पदन्त व सुविधि अशी दोन नावें आहेत. सुविधि या नांवाचा उल्लेख स्वतः आचायांनी 'त्वया प्रणीतं सुविधे स्वधाम्ना' या श्लोकचरणाने केला आहे. टीकाकाराने सुविधि शब्दाचे स्पष्टीकरण टीकेमध्ये केले आहे. आतां पुष्पदन्त या शब्दाचा अर्थ काय आहे हे पाहू. पुष्पदन्त मणजे कुन्दफुलाप्रमाणे दन्तपंक्ति ज्याची आहे तो पुष्पदन्त. अर्थात् यांची दन्तपंक्ति कुंदपुष्पाप्रमाणे मनोहर असल्यामुळे यांचे पुष्पदन्त हे नांव सार्थक होतें. मी वाग्भटकवींनी या तीर्थकराच्या पुष्पदन्त या नांवाची सार्थकता
सुंदर रीतीने व्यक्त केली आहे ती अशी:भूरिप्रभानिर्जितपुष्पदन्तः करायतिन्यकतपुष्पदन्तः । त्रिकालसेवागतपुष्पदन्तः श्रेयांसि नो यच्छतु पुष्पदन्तः ॥ अर्थ--चंद्र व सूर्य यांना पुष्पदंत असे म्हणतात. पुष्पदंत तीर्थकरांनी स्वतःच्या शरीरकान्तीने चंद्र व सूर्य यांना पराजित केले होते म्हणून यांनाच पुष्पदन्त झट्रले पाहिजे. यांचे हात गुडध्यापर्यंत लांब होते व पुष्ट होते. यामुळे यांनी आपल्या हातांनी पुष्पदन्त या नांवाच्या दिग्गजाला जिंकले होते. झणजे या दिग्गजाच्या सोंडेपेक्षा अधिक सुंदर यांचे हात होते. पुष्पदन्त नांवाचे देव यांची पूजा करण्यासाठी हमेशा येत असत यास्तव यांचंच नांव सार्थक होय. देव केवळ नामधारी होते. याप्रमाणे पुष्पदन्त या नांवाला सार्थक करणारे हे पुष्पदन्त तीर्थकर आमचें मंगल करोत.
याप्रमाणे पुष्पदन्त जिनाचे स्तोत्र संपले.
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org