________________
पर 'अस्ति' या शब्दाने अस्तित्वाचे ग्रहण होऊन नास्तित्व ध. मचिंही ग्रहण होईल. 'घागर' असा शब्द उच्चारल्याबरोबर घागरीचें ज्ञान तर होईलच परन्तु तो शब्द इतर पदार्थाचे ज्ञान देखील करून देईल. यामुळे इतर शबद उच्चारणे व्यर्थ होईल. 'नास्ति' शब्द उच्चारल्याबरोबर अस्तित्व धर्माचेही ज्ञान होईल. व या योगाने परद्रव्यचतुष्टयाने पदार्थ जसा नास्तित्व धर्माला धारण करतो तसे स्वरूपाने देखील तो नास्तिस्वरूपाचा होईल. या शंकेचा परिहार पुढील विवेचनाने होण्यासारखा आहे. तो असा
अस्ति शब्दाची प्रवृति व प्रतीति अस्तित्व धामध्ये होऊन ती नास्तित्व धर्मामध्येही होते परन्तु या अस्ति--शब्दाची प्रवृत्ति नास्तित्व धर्मामध्ये जी मुख्यतेने होत होती तिला आळा घालणारा ' स्यात् ' असा शब्द आहे अथवा कथञ्चित् ' हा आहे. त्यामुळे अस्ति हा शब्द अस्तित्व धर्माला मुख्यत्वेकरून दाखवितो परन्तु नास्तित्व धर्माला मुख्यत्वाने दाखवित नाही. तो शब्द नास्तित्व धर्माला गौण रीतीने दाखवितो. यामुळे पूर्वी जो बिलकुल शब्दाची सर्व अर्थामध्ये प्रवृत्ति झाल्यामुळे घोटाळा माजला होता त्याचा नाश या ' स्यात् ' शब्दानें केला, व शब्दाला त्याने व्यवस्थित स्वरूप देऊन त्या शब्दाची मुख्यतेने प्रवृति कोणत्या अर्थामध्ये होते व मौण रीतीने कोणत्या अर्थामध्ये कशी होते याचा योग्य निर्णय केला. तसेच प्रत्येक शब्दामध्ये मुख्य रीतीने स्वार्थ व गौण रीतीने अन्यार्थ दाखविण्याची शक्ति असते व ती ' स्यात्' . या शब्दाने [ हा शब्द मागें जोडल्याने ] प्रगट होऊन आप काम करू लागते. ... स्यात् ' शब्द आपण हमेशा बोलतांना कोठे मोजीत
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org