________________
(११४) मध्ये कार्य करण्याची शक्ति असते, व सहायक कारणामध्ये त्याची शक्ति व्यक्त करण्याचे सामर्थ्य असते. या उभय का रणांच्या मिलापाने उपादान कारण कार्य-स्वरूपाला धारण करते.
बसें, पदार्थ स्वद्रव्यलक्षण अंतरंग निमित्ताने व स्वक्षेत्रादि अंतरंग बहिरंग निमित्ताने अस्तित्वात्मक आहे; व परद्रव्यादि लक्षण बहिरंग निमित्ताने नास्तित्वात्मक आहे; तथापि या वि. रुद्ध धर्माला धारण करून देखील पदार्थाचे स्वरूप कायम राहते; तसेच वस्तूमध्ये नित्यत्व व अनित्यत्व हे देखील विरुद्ध नाही. द्रव्यलक्षण अंतरंग निमित्ताने वस्तु नित्य आहे क्षेत्र, काल, भाव इत्यादि बहिरंग निमित्तांच्या सम्बन्धाने वस्तु अनित्यधर्मात्मक आहे. हे सिद्ध होते. ह्मणून 'तदतत्स्वभावं' असें वस्तूचे वर्णन करतांना जे आचार्यांनी मटले आहे ते एवढ्या विवेचनाने सिद्ध झाले. याचप्रमाणे चेतनाचेतनात्मक धर्मही सिद्ध होतो. जसे जीवद्रव्य, प्रमेयत्व अमूर्तिकत्व इत्यादि गुणाकडे दृष्टि दिल्यास, अचेतन आहे, व ज्ञानदर्शनादि गुणाकडे दृष्टि दिल्यास चेतनही आहे; तसे सिद्ध जीवामध्येही मुक्तामुक्तता आहे. ती अशी:-कर्मरहित आहेत झणून सिद्ध जीव मुक्त आहेत व ज्ञानदर्शनादि गुणांचा त्यांनी त्याग केला नाही यास्तव ते अमुक्त आहेत.. याप्रमाणे परस्पर विरुद्ध स्वभाव द्रव्यामध्ये राहतात. परन्तु द्रव्याची त्यायोगे कोणतीही हानि होत नाही. ननु यद्यप्यनेकान्तात्मकं वस्तु प्रत्यक्षादिप्रमाणतः प्रसिद्धस्वरूप तथाप्यागमा
. देकान्तस्वरूपं तत्सेत्स्यतीत्याशंक्याह । जरी प्रत्यक्षादि प्रमाणांनी अनेकान्तात्मक वस्तूचे स्वरूप आहे असे सिद्ध होतें तथापि आगमानुसार वस्तु एकान्तात्मकच सिद्ध
होत असेल ? या शंकेचें आचार्य निरसन करतात.
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org